काँग्रेसचा स्थापना दिन औपचारिक

By Admin | Updated: December 29, 2014 00:06 IST2014-12-29T00:06:24+5:302014-12-29T00:06:24+5:30

प्रमुख पदाधिकारीसुद्धा गैरहजर.

Congress formation day formal | काँग्रेसचा स्थापना दिन औपचारिक

काँग्रेसचा स्थापना दिन औपचारिक

बुलडाणा : सत्ता असताना मोठय़ा दिमाखात साजरा होणार्‍या काँग्रेसच्या स्थापना दिनी आज जिल्हाभरात औपचारिक स्वरूपात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमांसाठी दोन्ही आमदारांसह जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारीही गैरहजर असल्याने केवळ सदस्य नोंदणी सुरू करून कार्यक्रम उरकण्यात आला. काँग्रेसच्या स्थापना दिनी जिल्हाभरात मोठ-मोठे कार्यक्रम घेतले जात असत. यावेळी मात्र केंद्रातील सत्तेपाठोपाठ राज्यातील सत्ताही गेल्याने कार्यकर्त्यांंचा झालेला हिरमोड स्थापना दिनाच्या कार्यक्रमातूनही दिसून आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे हे पूर्वनियोजित कार्यक्रमामध्ये गेल्या आठ दिवसांपासून शहराबाहेर आहेत. ते आजही शहरात नसल्याने कार्यक्रमात उपस्थित नव्हते. त्यांच्या गैरहजेरीत जिल्हा काँग्रेस कमेटीत झालेला कार्यक्रम हा स्वाक्षरी अभियानाची सुरुात करून उरकण्यात आला. यावेळी एक-दोन पदाधिकारी सोडले तर जिल्हास्तरावरील एकही नेता कार्यक्रमाला उपस्थित नव्हता. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ हे राज्यस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जयपूर येथे होते. चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचीसुद्धा कार्यक्रमात उपस्थितीती दिसून आली नाही. खामगावात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी मात्र सदस्य नोंदणी अभियान नेहमीच्याच स्टाईलमध्ये घेतले.

Web Title: Congress formation day formal