महिलांसाठी तक्रारपेट्या

By Admin | Updated: June 20, 2014 00:17 IST2014-06-19T23:29:38+5:302014-06-20T00:17:54+5:30

शहर पोलिसांचा उपक्रम

Complaints for women | महिलांसाठी तक्रारपेट्या

महिलांसाठी तक्रारपेट्या

लोणार : महिलांना आपल्यावर होणार्‍या अन्यायाची माहिती पोलिसांपर्यंत पोहचविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी महिला तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत. शहरात पोलिस विभागाने लावलेल्या या तक्रार पेट्यामुळे पिडीत महिला व युवतींना एक प्रकारे आधार मिळाला आहे. युवती व महिलांवरील वाढत्या आत्याचाराच्या घटनेची दखल घेत राज्य शासनाने पोलिस विभागाच्या माध्यमातून विविध ठिकाणी महिला तक्रार पेट्या लावण्यास सुरूवात केलेली आहे. महिलेवर अत्याचार झाला तर महिला थेट तक्रार पेटीत तक्रार दाखल करु शकते. यापूर्वी पोलिस विभागाने बसस्थानक, पोलिस स्टेशन, तहसिल कार्यालय, शाळा महाविद्यालयात तक्रार पेट्या लावल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी पेट्या खराब झाल्याने ठाणेदार यशवंत बावीस्कर यांच्या पुढाकारातून आज शहरातील पोलिस स्टेशन, तहसिलक कार्यालय, बस स्थानक, शाळा, महाविद्यालय यासह विविध ठिकाणी महिला तक्रार पेट्या लावण्यात आल्या आहेत. शासनाने महिलांकरीता सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असला तरी अशिक्षित महिलांवर अत्याचार झाला तर तीला या तक्रार पेटीचा फायदा काय होणार ? असा प्रश्न जनसमान्यांमधुन उपस्थित होत आहे. महिला व युवतीवर अत्याचार होऊ नये, यासाठी शासनाने जनजागृती करण्याची गरज आहे. विविध सामाजिक संस्था, संघटनांनीही पुढाकरा घ्यावा, अशी महिलावर्गातून अपेक्षा आहे.

Web Title: Complaints for women