शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा गटविकास अधिका-यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:54 IST

संग्रामपूर गावात आर.ओ प्लांट बसविण्याची मागणी.

संग्रामपूर (जि. बुलडाणा) : गावातील विविध समस्यांसाठी संग्रामपूर तालुक्यातील झाशी येथील नागरिकांनी सोमवारी दुपारी गटविकास अधिकार्‍यांना घेराव घातला. गावातील समस्यांकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावेळी ग्रामस्थांनी कमालीचा संताप व्यक्त केला. तालुक्यातील झाशी या गावाचा समावेश धामणगाव गोतमारे या ग्रामपंचायतीत होतो. गावात पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे. दरम्यान, गावात पिण्याच्या पाण्याकरिता हापशी तसेच ग्रामपंचायतने अधिग्रहीत केलेले बोअरवेल आहे. परंतु यामध्ये क्षारयुक्त पाणी पुरवठा गावात होते व त्यामुळे गावातील बरेच नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. मागील महिन्यात किडनीच्या आजाराने गावातील ४ लोकांचा मृत्यू झाला असून सद्यास्थितीतही बरेच किडनीचे रुग्ण आहेत. त्यामुळे गावाला शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, यासह गावातील विविध समस्या सोडविण्यात याव्यात,याबाबत ग्रामस्थांच्यावतीने वारंवार पाठ पुरावा करण्यात आला. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकरी बचाओ आंदोलन समितीच्यावतीने बीडीओंना घेराव घालण्यात आला. यामध्ये तालुका संघटक केशव घाटे, माजी सरपंच पुंजाजी जानराव जळमकार, सुनंदा पुंजाजी जळमकार, ग्रा.पं.सदस्या, वसंत नामदेव जळमकार, विलास देविदास चव्हाण, यांच्यासह गावातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. याप्रसंगी पं.स.गट विकास अधिकारी डॉ.हिरोळे, पं.स.सदस्य लोकेश राठी, विस्तार अधिकारी भिलावेकर, आरोग्य विस्तार अधिकारी राठोड यांनी नागरिकांच्या समस्यांचे समाधान केले. यावेळी गटविकास अधिकारी तसेच पाणी पुरवठाच्या अधिकार्‍यांनी गावात येवून पाहणी करुन योग्य ती पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही गटविकास अधिकार्‍यांना सादर करण्यात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून तामगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार बी.आर.गिते यांनी प्रशासकीय कार्यालयात उपस्थिती लावली होती.