नगर परिषद कर्मचार्‍यांचा संप सुरूच

By Admin | Updated: July 22, 2014 00:12 IST2014-07-22T00:12:58+5:302014-07-22T00:12:58+5:30

१५ जुलैपासून चिखली नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी बेमुदत आंदोलन चालविले

City Council employees continue | नगर परिषद कर्मचार्‍यांचा संप सुरूच

नगर परिषद कर्मचार्‍यांचा संप सुरूच

चिखली : विविध मागण्यांसाठी १५ जुलैपासून चिखली नगर परिषदेच्या कर्मचार्‍यांनी बेमुदत आंदोलन चालविले असून, या आंदोलनास ६ दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नसल्यामुळे नगर परिषदेतील कार्यालयीन काम ठप्प पडले आहे. दरम्यान, २१ जुलै रोजी आ. राहुल बोंद्रे व नगराध्यक्ष शोभाताई सवडतकर यांनी संपकरी कर्मचार्‍यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रसंगी आ. राहुल बोंद्रे यांनी कर्मचार्‍यांना मागण्यांबाबत स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी न.प. उपाध्यक्ष म. असीफ, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, पप्पुसेठ हरलालका, माजी नगराध्यक्ष अरुणाताई कदम, रामदास देव्हडे, दीपक देशमाने, डॉ. प्रकाश शिंगणे, दीपक लहाने, सुनील सुरडकर, किशोर कदम, नंदकिशोर सवडतकर, गोकूळ शिंगणे, विजय गाडेकर, रामदास मोरे आदींची उपस्थिती होती. प्रसंगी न.प. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुनराव इंगळे यांनी कर्मचार्‍यांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. या संपात कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष एफ.बी. शिंगणे, अभियंता एस.पी. भालेराव, अजय व्यवहारे, मुख्य लिपिक अ. रऊफ, लेखपाल टी.आर. बनसोडे, पर्यवेक्षक बी.डी. जाधव, अमित कोलते, दिलीप इंगळे, मगर, जयेश खरात, एस.एस. कुळकर्णी, म. सादीक, शे. जावेद, नरेंद्र कुटे, कैलास नन्हई, ए.के. जाधव, प्रकाश पडोळ, आर.व्ही. रावे, पी.पी. सोळंकी, पी.जी. भवर आदींसह सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Web Title: City Council employees continue