चोखामेळा जन्मस्थळाचे नंदनवन करू

By Admin | Updated: January 14, 2015 23:44 IST2015-01-14T23:44:34+5:302015-01-14T23:44:34+5:30

मेहुणाराजा येथे जन्मोत्सव सोहळ्यात खेडेकरांची ग्वाही.

Chokhamela will celebrate the birthplace of the birthplace | चोखामेळा जन्मस्थळाचे नंदनवन करू

चोखामेळा जन्मस्थळाचे नंदनवन करू

देऊळगावराजा (बुलडाणा): संत चोखामेळाचे जन्मस्थान असलेल्या मेहुणाराजाची विकासाच्या बाबतीत उपेक्षा झाली; मात्र येणार्‍या काळात जन्मस्थळाच्या विकासासाठी ठोस असा कृती कार्यक्रम तयार करून या परिसराला नंदनवन करू, अशी ग्वाही आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी दिली.
संत चोखामेळा यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने मेहुणाराजा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्ष अलका खंडारे, उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, पं.स. सभापती अनिता झोटे, माजी आमदार तोताराम कायंदे, जि.प.सदस्य सविता मुंडे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, प्रदीप नागरे, प्रा.कमलेश खिल्लारे, पं.स.उपसभापती सुधाकर म्हस्के, कैकयी नागरे, नंदा शिंगणे, सिद्दीक कुरेशी, भगवान नागरे, माजी जि.प.सदस्य उषा खेडेकर, मनोज कायंदे, दादाराव खार्डे, सरपंच प्रदीप हिवाळे, उषा काकडे आदी उपस्थित होते.
आ.खेडेकर म्हणाले की, मतदारसंघाचा विकास आराखडा ठरवताना मेहुणाराजाचा विकास हे प्राधान्य राहील. संत चोखासागर जलाशयामुळे मेहुणा राजाचे रखडलेले पुनर्वसनही मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रा.कमलेश खिल्लारे यांनी चोखोबांच्या महतीवर मार्गदर्शन केले.

Web Title: Chokhamela will celebrate the birthplace of the birthplace