शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

By admin | Updated: December 24, 2014 00:14 IST

आरोपींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी.

चिखली (बुलडाणा) : महिला आणि बालविकास मंत्रालय नवजात शिशू जन्म पंजीकरण केंद्रासाठी स्थानिक वृत्तपत्रात पाहिजेत या सदराखाली जाहिरात देऊन सुशिक्षित बेरोजगार युवकास नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक लुबाडणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊनही फसवणूक करणार्‍यांवर अद्यापपर्यंत कारवाई झालेली नसल्याचा प्रकार घडला आहे. डिसेंबर २0१३ मध्ये एका वृत्तपत्रात महिला आणि बालविकास मंत्रालय नवजात शिशू जन्म पंजीकरण केंद्र याकरिता मुले व मुली पाहिजेत या आशयाची जाहिरात आल्याने तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील अनंथा सखाराम ठेंग या तरुणाने संपर्क साधून संपूर्ण बायोडाटा व आवश्यक कागदपत्रे पाठविली होती. त्यानुसार त्याची ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून नियुक्तीपत्र देऊन महाराष्ट्र सुकन्या बालविकास योजना २८८, बाल भवन इमारत, मापुसा रोड, टुन बोस्को शाळेजवळ, पणजी, गोवा यांनी अनंथा ठेंग यास प्रथम प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार असल्याचे सांगून त्यासाठी ट्रेनिंग सेक्युरिटी म्हणून रक्कम जमा करण्यास सांगितले. त्यानुसार ठेंग याने ६ जानेवारी २0१४ रोजी १३ हजार २00 व ७ जानेवारी रोजी १५ हजार रुपये अमडापूर स्टेट बँकेच्या शाखेत जाऊन २0१७३२१६१५ या खात्यात जमा केले. दरम्यान, ही प्रक्रिया पूर्ण होऊन तसेच नियुक्तीपत्र मिळूनही बराच कालावधी उलटल्यानंतर अनंथा ठेंग याने संबंधितांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता प्रारंभी ट्रेनिंग प्रक्रिया प्रोसेसमध्ये असल्याचे सांगण्यात आले व काही दिवसांनंतर सदरचा दूरध्वनी क्रमांकही बंद करण्यात आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ठेंग याने अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली. यावरून अमडापूर पोलिसांनी १६ एप्रिल २0१४ रोजी भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला आहे; मात्र या सर्व प्रकाराला वर्षभराचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंंत आपल्याला न्याय मिळाला नसल्याने याप्रकरणी तातडीने कारवाई व्हावी व माझ्याकडून फसवणूक करून घेतलेली रक्कम परत देण्यात मिळावी, अशी मागणी अनंथा ठेंग याने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.