स्वस्तातील गॉगल पडतो महागात

By Admin | Updated: May 12, 2014 22:37 IST2014-05-12T22:04:21+5:302014-05-12T22:37:03+5:30

डोळ्यांचे आजार बळावतात

Cheap goggle falls in the price | स्वस्तातील गॉगल पडतो महागात

स्वस्तातील गॉगल पडतो महागात

बुलडाणा : शहरातील मार्ग तसेच महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या दुकानांतून गॉगल विकत घेण्याचा विचार करीत असाल, तर सावधान! या नॉन ब्रँडेड गॉगल्समुळे प्रवासादरम्यान ऊन आणि धुळीपासून आपल्याला तात्पुरती सुटका मिळेल; पण याचे दूरगामी परिणाम गंभीर स्वरूपाचे आहेत. याच्या वापराने डोकेदुखी, डोळ्यात जळजळ आणि अंधुक दिसणे यासारख्या व्याधींचा मोठा धोका आहे.

स्वस्ताच्या नादात आपल्या डोळ्यांशी खेळ करण्यासारखा हा प्रकार आहे. बुलडाण्यासह अनेक शहरातील मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी गॉगल विक्रीचा धंदा तेजीत आहे. चिखली व मलकापूर मार्गावरदेखील ही दुकाने सुरू आहेत. शहराबाहेरील इतर मार्गावरही ही दुकाने आढळतात. शहराच्या चारही बाजूंनी अशा प्रकारची ३0 ते ५0 दुकाने असल्याची माहिती या क्षेत्नातील व्यावसायिकाने दिली. सर्वच दुकांनावर गॉगल्स खरेदीकरिता ग्राहकांची गर्दी उसळलेली असते; मात्न त्यांची कोठेही नोंद नसल्याने दुकानांची अचूक संख्या प्रशासनाकडे उपलब्ध नाही. एकीकडे शास्त्नोक्त पद्धतीने तयार न करण्यात आलेले स्वस्तातील गॉगल्स विकून नागरिकांचे डोळे खराब करणे, दुसरीकडे विनापरवानगी दुकाने थाटून शासनाचा कर बुडविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. रस्ते का माल सस्ते में ही म्हण आता गॉगलच्याही बाबतीत तंतोतंत खरी ठरत आहे. पूर्वी गॉगल किंवा चश्मा घेण्यासाठी दुकानात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दुकानांमध्येही बँड्रेड आणि नॉन-ब्रँडेंड अशा दोन्ही प्रकारचे गॉगल्स मिळतात. नॉन-ब्रँडेड गॉगल्स ब्रँडेडच्या तुलनेत स्वस्त असले तरी चोखंदळ ग्राहकांची ब्रँडेड गॉगल्सलाच अधिक पसंती आहे. दुकानांमध्ये मिळणारे नॉन-ब्रँडेड गॉगल्स नामांकित कंपन्यांचे नसले तरी ते रस्त्यावरील गॉगल्ससारखे डोळ्यांना हानिकारक नाहीत; परंतु गेल्या ६-७ वर्षांत गॉगल विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटल्याने ग्राहकांचा ओढा अधिक वाढला आहे.

Web Title: Cheap goggle falls in the price