शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सभापती, उपसभापतीपदासाठी चुरस!

By admin | Updated: March 12, 2017 02:12 IST

१४ मार्च रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत: पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग

बुलडाणा, दि. ११- १४ मार्च रोजी पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने बहुमत न मिळालेल्या पंचायत समितींमध्ये समीकरणे जुळविण्यासाठी पक्षांमध्ये काथ्याकूट करण्यात येत असून, काही ठिकाणी अभद्र युती होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली असून, होळीचा रंगोत्सव संपताच २१ मार्च रोजी जिल्हा परिषदेत तर १४ मार्च रोजी पंचायत समितीत सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. आगामी दोन दिवस सर्वत्र होळीच्या रंगाची उधळण होणार असली, तरी राजकीय वतरुळात मात्र पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. पंचायत समितीच्या सभापतीची माळ आपल्या गळ्यात पडण्यासाठी सदस्य नेत्यांकडे फिल्डींग लावत आहेत. बुलडाणा पंचायत समितीमध्ये पंचायत समितीच्या एकूण १२ जागा असून, काँग्रेसचे पाच सदस्य विजयी झाले आहेत तर शिवसेना २, भाजप २, राष्ट्रवादी काँग्रेस १, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला १ व भारिपला एक जागा मिळाली आहे. पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापन करण्याकरिता काँग्रेसला दोन जागांची गरज आहे, त्यामुळे काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस व भारिपची मदत घेऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. भाजपही सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करीत असून, आकड्यांची जुळवाजुळव करीत आहेत. मोताळा तालुक्यात पंचायत समितीच्या आठ जागा आहेत. त्यापैकी काँग्रेसला चार तर शिवसेना दोन, भाजप एक व भारिपला एक जागा मिळाली आहे. येथे काँग्रेसला ५0 टक्के जागा मिळाले असल्यामुळे काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. देऊळगाव राजा पंचायत समितीमध्ये एकूण सहा जागा असून, राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून, चार जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला एक तर भाजपला एक जागा मिळाली आहे. मेहकरमध्येही शिवसेनेला स्पष्ट बहुमत असल्यामुळे सभापती व उपसभापती कुणाला करायचे, यासाठी पंचायत समिती सदस्य फिल्डींग लावून आहेत. मेहकरमध्ये १२ पैकी ९ जागांवर शिवसेनेच्या उमेदवाराचा तर दोन ठिकाणी काँग्रेस व एका पंचायत समिती सर्कलमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. लोणारमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, आठ पैकी शिवसेनेला चार तर काँग्रेसला व राष्ट्रवादीला दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याकरिता एका जागेची गरज आहे.भाजपाच्या गीता बोंडल सभापती?जळगाव जामोद पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक मंगळवार १४ मार्च रोजी होत असून, जळगाव जामोदच्या सभापती म्हणून भाजपाच्या गीताबाई तेजसिंग बोंडल यांची अविरोध निवड होणे अपेक्षित आहे. कारण सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव असून, या प्रवर्गाच्या गीताबाई बोंडल या एकमेव पं.स. सदस्य आहेत. सभापतीसोबतच उपसभापती पदाचीसुद्धा निवडणूक होत असून, त्याकरिता मात्र अद्याप कोणाचेही नाव निश्‍चित झाले नाही. जळगाव जामोद पंचायत समितीमध्ये आठ सदस्य संख्या आहे. त्यापैकी ४ भाजपा, २ काँग्रेस, १ शिवसेना व १ भारिप-बमसं अशी पक्षनिहाय स्थिती आहे. सभापतीपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदावर आसलगाव गणाच्या गीताबाई तेजसिंग बोंडल (भाजपा) या अविरोध विराजमान होणार आहेत. उपसभापतीपदासाठी मात्र रस्सीखेच होऊ शकते. प्रसंगी भाजपाने ह्यएकला चलो रेह्ण ची भूमिका घेतल्यास या पदासाठी ईश्‍वर चिठ्ठीसुद्धा होऊ शकते. अशा आठ पैकी सर्वाधिक चार जागा भाजपाकडे असल्या तरी बहुमतासाठी एक जागा कमी आहे. अशा परिस्थितीत भाजपा-शिवसेना या मित्रपक्षांनी मैत्री करून बहुमत मिळवू शकते.