शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मोफत पास योजनेची मुदत संपल्याने विद्यार्थिनी अडचणीत

By admin | Updated: March 25, 2017 02:37 IST

३१ मार्चला मुदत संपणार: एप्रिल महिन्यात परीक्षा

हर्षनंदन वाघबुलडाणा, दि. २४- एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. याशिवाय अहल्याबाई होळकर मोफत प्रवास सवलत योजनेंतर्गत शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात किंवा बाहेरगावी जाणार्‍या विद्यार्थिनींसाठी एसटी बसने मोफत प्रवासाची सोय करण्यात आली; मात्र मोफत पासची मुदत ३१ मार्च रोजी संपणार असल्याने व एप्रिल महिन्यात परीक्षा असल्यामुळे या योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थिनींच्या पुढे अडचण उभी राहिली आहे.शहर परिसरात शिक्षणासाठी येणार्‍या विद्यार्थिनींना बसच्या पाससाठी दर महिन्याला पैसे मोजावे लागत होते. ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी अहल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना लागू केली. ही योजना १९९६ पासून लागू करण्यात आली असून, या योजनेत ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणार्‍या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवासाची सोय केली आहे. यावर्षी शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवासाची सुविधा ३१ मार्चपर्यंत देण्यात आली आहे; मात्र परीक्षा एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. त्यामुळे मोफत प्रवासाची सुविधा घेणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थिनी अडचणीत आल्या आहेत. यासाठी एसटी महामंडळाने विद्यार्थिनींना मोफत प्रवासासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित शाळेने प्रस्ताव सादर करावा!अहल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत प्रवास योजना एप्रिल महिन्यात परीक्षा काळात सुरू ठेवण्यासाठी संबंधित शाळेने शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या पत्रासह प्रस्ताव सादर केल्यास मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती बुलडाणा आगार प्रमुख दीपक साळवे यांनी दिली.

सदर योजनेस ३१ मार्चनंतरही मुदतवाढ दिल्यास एप्रिल महिन्यात परीक्षा असलेल्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ होईल.-अ.ज. सोनवणे, माध्यमिक, शिक्षणाधिकारी, बुलडाणा