अरुंद पुलाच्या दाेन्ही बाजू गेल्या वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:34+5:302021-06-18T04:24:34+5:30

त्यामुळे अंत्री देशमुख आणि त्या मार्गावर येणारे बोरखेडी, निजामपूर, मोहोतखेड, गुंधा, हिरडव, बागुलखेड, वढव, दाभा इत्यादी गावाचा मेहकरकडे होणारा ...

Carrying past the right side of the narrow bridge | अरुंद पुलाच्या दाेन्ही बाजू गेल्या वाहून

अरुंद पुलाच्या दाेन्ही बाजू गेल्या वाहून

Next

त्यामुळे अंत्री देशमुख आणि त्या मार्गावर येणारे बोरखेडी, निजामपूर, मोहोतखेड, गुंधा, हिरडव, बागुलखेड, वढव, दाभा इत्यादी गावाचा मेहकरकडे होणारा संपर्क खंडित झाला आहे. दरवर्षी पावसाळा येतोच त्यासोबत पैनगंगा नदीला पूर येतो आणि छोटा असलेला पूल मात्र कुचकामी ठरतो. त्यामध्ये झुडपे अडकते आणि त्यामुळेच पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग वाहून जातो. या मार्गावर दररोज हजारो दुचाकी, शेकडो चारचाकी आणि कितीतरी ट्रॅक्टर व इतर वाहने ये-जा करत असतात. कामानिमित्त मेहकरला येणारे लोक, कार्यालयीन कामासाठी येणारे नोकरदार तसेच विद्यार्थी आणि दोन्ही बाजूकडे ये-जा करणारे शेतकरी यांची संख्या माेठी आहे़ पावसाळ्यात दरवर्षी हा पूल वाहून जाताे़ उंची लहान असल्याने या पुलावरून पाणी वाहते़ त्यामुळे या भागातील लाेकांचा मेहकरशी संपर्क तुटताे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी हाेत आहे. दरम्यान, सायंकाळी अडकलेले फुरसन काढून, तात्पुरती व्यवस्था म्हणून दोन्ही बाजूने मुरूम टाकून ये-जा सुरू करण्यात आली आहे़

Web Title: Carrying past the right side of the narrow bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.