भरधाव ट्रकची कारला धडक

By Admin | Updated: April 23, 2017 19:42 IST2017-04-23T19:42:31+5:302017-04-23T19:42:31+5:30

खामगाव : भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने २ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर खामगाव ते बाळापूर दरम्यान चितोडा फाट्यानजीक घडली

Carriage of the Flying Car | भरधाव ट्रकची कारला धडक

भरधाव ट्रकची कारला धडक

खामगाव : भरधाव ट्रकने कारला धडक दिल्याने २ जण जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर खामगाव ते बाळापूर दरम्यान चितोडा फाट्यानजीक घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. घाटपुरी येथील अमोल सहदेव शेगोकार (वय ३०) हा शनिवारी कार क्रमांक एम.एच.२८ व्ही २८७७ ने प्रवासी घेवून अमरावतीकडे जात होता. दरम्यान उपरोक्त ठिकाणी पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.पी.१३ एच ०२७५ ने कारला धडक दिली. या अपघातात कारचालक अमोल शेगोकार व अन्य एक प्रवासी असे दोघे जखमी झाले. याप्रकरणी कारचालक अमोल शेगोकार याने दिलेल्या फिर्यादीवरुन खामगाव ग्रामीण पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द कलम २७९, ३३७, ४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Carriage of the Flying Car