शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अडतेच बनले खरेदीदार!

By admin | Updated: March 24, 2017 01:34 IST

बुलडाण्याचा माल जातो खामगावला; ऐन हंगामाच्या काळात बाजार समितीमध्ये शुकशुकाट!

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि.२३- तूरीसह गहू, हरभरा बाजार समितीमध्ये येत असून, बजार समित्यांमध्ये सध्या माल खरेदीचा हंगाम सुरू आहे; मात्र तुरीच्या नाफेड खरेदी बंदसह विविध सुविधांअभावी बुलडाणा बाजार समितीमध्ये ऐन हंगामाच्या काळातच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. येथे ठोक खरेदीदार नसल्याने अडतेच या ठिकाणी खरेदीदार बनले आहेत. त्यामुळे बुलडाणा तालुक्यातील माल खामगावच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जातो.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल उत्पादक म्हणजे शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे; मात्र बाजार समितीमध्ये शेतकरी आल्यानंतर त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे येथील बाजार समितीमध्ये दिसून येते. बुलडाणा बाजार समितीमध्ये खरेदीदारांचा अभाव आहे. जिल्ह्यात खामगाव, चिखली व मेहकर याठिकाणी मोठे खरेदीदार आहेत; मात्र बुलडाण्यात तशा प्रकारचे खरेदीदार नसल्याने अडतेच खरेदीदार बनले आहेत. सध्या तुरीपाठोपाठ गहू, हरभर, मका आदी माल शेतकरी विक्रीसाठी बाजार समित्यांमध्ये आणत आहेत. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये शेतमालाची आवक वाढलेली दिसून येते; मात्र बुलडाण्याच्या बाजार समितीमध्ये याउलट परिस्थिती आहे. शेतकरी बैलगाडीने शेतमाल घेऊन आल्यास सदर शेतकर्‍याची कुठलीच व्यवस्था दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी नाफेडमध्ये तूर विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकर्‍यांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागला. बैलगाडी घेऊन आलेल्या शेतकर्‍यांना बैलगाडी रांगेत लावावी लागली; मात्र बैलांसाठी चारा व पाण्याची या बाजार समितीमध्ये कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. ११ एकराचा परिसर असलेल्या या बाजार समितीमध्ये बैलगाडीद्वारे माल घेऊन आलेल्या शेतकर्‍यांच्या बैलांना चारा उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची खंत शेतकर्‍यांनी व्यक्त केली; तसेच खरेदीदाराअभावी योग्य भाव शेतमालाला मिळत नाही. बुलडाण्यातील शेतमाल खामगावच्या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा विविध अडचणींमुळे बुलडाणा येथील बाजार समितीच्या गेटसमोरून दिवसाकाठी ३0 ते ४0 वाहने धाड, खामगाव, चिखली येथील बाजार समित्यांमध्ये जात आहे. त्याचबरोबर बजार समितीमधील प्रशासकीय कारभारही ढेपाळल्याचे दिसून येते.