गोठा जाळल्याने अडीच लाखाचे नुकसान

By Admin | Updated: May 13, 2014 22:36 IST2014-05-13T22:35:32+5:302014-05-13T22:36:15+5:30

गोठय़ाला आग लावल्याने शेतीपयोगी साहित्य जळून शेतकर्‍याचे अडीच लाखाचे नुकसान झाले. ही घटना भालेगाव शिवारात घडली.

Burning of the granite damages two and a half lakhs | गोठा जाळल्याने अडीच लाखाचे नुकसान

गोठा जाळल्याने अडीच लाखाचे नुकसान

खामगाव : गोठय़ाला आग लावल्याने शेतीपयोगी साहित्य जळून शेतकर्‍याचे अडीच लाखाचे नुकसान झाले. ही घटना भालेगाव शिवारात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा केला आहे. भालेगाव बाजार येथील शेतकरी सोपान वामनराव मुर्‍हे यांनी शेतीपयोगी साहित्य ठेवण्यासाठी शेतात गोठा बांधला होता. या गोठय़ामध्ये त्यांनी ठिंबक सिंचन संच, स्प्रिंक्लर संच, मायक्रो स्प्रिंक्लर संच, पाईप, ताडपत्री, लाकडी शेती अवजारे, ताडपत्री व इतर शेतीपयोगी साहित्य तसेच चाराकुटार ठेवले होते. दरम्यान, शनिवार १0 मे रोजी दुपारी १ त्यांचे शेजारी डॉ.अशोक रघुनाथ बाळ, सुरेश रघुनाथ बाळ, रामदास रघुनाथ बाळ यांनी संगनमत करुन पूर्ववैमनस्यातून सोपान मुर्‍हे यांचा गोठा पेटवून दिला. त्यामुळे क्षणार्धात गोठा व त्यामधील साहित्य जळून खाक झाले. झालेल्या नुकसानीचा पंचनामा मंडळ अधिकारी महाजन यांनी केला आहे; तसेच याप्रकरणी सोपान मुर्‍हे यांनी पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी डॉ. अशोक रघुनाथ बाळ, सुरेश रघुनाथ बाळ, रामदास रघुनाथ बाळ अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ बाठे करीत आहेत.

Web Title: Burning of the granite damages two and a half lakhs