बुलडाण्यात घरफोडी

By Admin | Updated: January 28, 2015 23:40 IST2015-01-28T23:40:02+5:302015-01-28T23:40:02+5:30

६२ हजाराचा माल लंपास.

Burglary in Buldhana | बुलडाण्यात घरफोडी

बुलडाण्यात घरफोडी

बुलडाणा : घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्याच्या दागीन्यासह ६२ हजार रुपयाचा माल लंपास केला आहे. ही घटना काल मंगळवारी मध्यरात्रीचे सुमारास केशव नगर येथे घडली. प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पाटबंधारे विभागातून सेवानवृत्त झालेले शाम प्रभाकर देशपांडे (६0) हे केशव नगर येथे राहातात. दोन दिवसापुर्वी आजारी असलेल्या सासर्‍याला पाहण्यासाठी ते कुटूंबासह घराला कुलूप लावून अकोल्याला गेले होते. यावेळी त्यांनी घराच्या चाब्या भाडेकरुकडे दिल्या होत्या. दरम्यान काल मध्यरात्रीचे सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी कपाटातील रोख वीस हजार रुपये, पंधरा हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठय़ा, वीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके व सात हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र असा एकूण ६२ हजार रुपयाचा माल चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान आज सकाळी ही घटना उघडकीस आली. प्रकरणी शहर पोलिसांनी शाम देशपांडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Burglary in Buldhana