बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ

By Admin | Updated: January 14, 2015 00:40 IST2015-01-14T00:40:59+5:302015-01-14T00:40:59+5:30

जिप अध्यक्षपदी अलका खंडारे तर मुख्यकारी अधिकारीपदी दीपा मुधोळ; बुलडाणा जिपवर सर्वाथाने महिलाराज.

Buldhana Zilla Parishad CEO Deepa Mudhol | बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या सीईओ दीपा मुधोळ

बुलडाणा : बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारीपदी चंद्रपूर जिल्हय़ातील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बुलडाणा जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर सन ९७-९८ या कार्यकाळात मुख्य कार्यपालन अधिकारी पदाची जबाबदारी सोनिया सेठी यांनी सांभाळली. त्यानंतर दुसर्‍यांदा महिला मुख्य कार्यपालन अधिकारी बुलडाण्याला मिळाले आहेत. दीपा मुधोळ या २0११ च्या आयएएस तुकडीच्या प्रशिक्षणार्थी आहेत. त्यांच्याकडे सध्या ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी पदाची जबाबदारी आहे.
विद्यमान मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना सध्या कुठेही नियुक्ती देण्यात आली नसून, वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. ओमप्रकाश देशमुख यांची कारकीर्द कुठल्याही वादात न अडक ता पार पडली. अध्यक्षपदी अलका खंडारे असल्याने मुधोळ यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेवर सर्वा र्थाने महिला राज प्रस्थापित होणार आहे.

Web Title: Buldhana Zilla Parishad CEO Deepa Mudhol