शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जि. प. अध्यक्षपदी भाजपाच्या उमाताई तायडे

By admin | Updated: March 21, 2017 18:33 IST

बुलडाणा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदी भाजपच्या उमा तायडे तर उपाध्यक्षपदी मंगला रायपुरे यांची निवड झाली

 ऑनलाइन लोकमतबुलडाणा : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला. राष्ट्रवादीला सोबत घेवून भाजपने सत्ता स्थापण केली असून, अध्यक्षपदी भाजपच्या उमा तायडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगला रायपुरे यांची निवड करण्यात आली. जिल्हा परिषदेतील सभागृहात मंगळवारी दुपारी पार पडेलल्या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदाच्या उमेदवार उमा तायडे यांना ३४ तर काँग्रेसच्या यशोदा चोपडे यांना २६ मते मिळाली. जिल्हा परिषदेत निवडणुकीत कुणालाही स्पष्ट बहूमत मिळाले नसल्याने गत पंधरा दिवसांपासून सत्ता स्थापण करण्याकरिता प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरू होते.  ६० जागांपैकी भाजपला सर्वात जास्त २४ तर काँग्रेस १४, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस ८, भारिप २ आणि दोन अपक्ष विजयी झाले. सत्ता स्थापणेकरिता ३१ सदस्यांची गरज होती. त्यामुळे भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेवून सत्ता स्थापण केली. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र येवून सत्ता स्थापण करण्यासाठी प्रयत्न झाले. मात्र, राष्ट्रवादीचे नेते माजी कॅबिनेटमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजता भाजपच्या उमा तायडे यांनी अध्यक्षपदासाठी तर राष्ट्रवादीच्या मंगला रायपुरे यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. तसेच काँग्रेसच्यावतीने यशोदा चोपडे यांनी अध्यक्षपदासाठी तर भोजने यांनी उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. ३४ विरूद्ध २४ मतांनी उमा तायडे यांचाी अध्यक्षपदी तर मंगला रायपुरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपचे २४ सदस्य असून, त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला. तसेच राष्ट्रवादीचे आठ सदस्य असून, त्यांना एका अपक्षाने पाठिंबा दिला. तर भारिपने भाजपच्या विरोधात मतदान केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदी तायडे व उपाध्यक्षपदी रायपुरे यांची निवड झाल्याचे जाहीर होताच ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.