शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!

By admin | Updated: March 18, 2017 01:10 IST

८५ हजार शेतकरी; १७0४ कोटी कर्जाचे ओझे.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १७- गत चार वर्षांचा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यावर कर्जाचा बोजा वाढला असून, जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांवर १७0४ कोटींचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. भविष्यात हे कर्ज माफ व्हावे, अशी अपेक्षा आता बळीराजाकडून व्यक्त होत आहे. सततची नापिकी, दुष्काळ आणि दरातील अभावामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाला. गत दिडवर्षात जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारी स्थितीमुळे १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा,यासाठी सध्या लोकप्रतिनिंधीकडून कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय घ्यायचा झाल्यास शासनाच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडू शकतो, याची आकडेमोड सुरू आहे. आता कर्जमाफी व्हावी,अशी अपेक्षा बळीराजाकडूनही व्यक्त होत आहे.१७0४ कोटीचे पीक कर्ज थकले!जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांकडे तब्बल १७0४ कोटी रुपयाचे कर्ज थकले आहे. यात खरीपातील १ लाख १0 हजार शेतकरी व रब्बीतील ७४ हजार ५00 शेतकर्‍यांना समावेश आहे. जिल्हा केंद्रीय बँकेकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा सहकारी बँकेचे ३४२ कोटी आणि सर्व राष्ट्रीय बँका व ग्रामीण बँका यांचे १३६२ कोटीचे पिककर्ज थकले आहे.वर्षभरात २१७ शेतकरी आत्महत्यासततची नापिकी व वाढण्यार्‍या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यात २१७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापैकी नापिकीमुळे ६१ आणि कर्जबाजारीपणातून ६१ अशा १२२ शेतकर्‍यांची आत्महत्या केल्याची नोंद शासणदरबारी आहे.यंदा वाटले १0६२ कोटीचे पीक कर्ज !२0१६-१७ खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकाकडून जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६५ हजार ३३८ शेतकर्‍यांना १0६२ कोटी रुपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. यात खरीपासाठी १ लाख ४७ हजार ६७५ शेतकर्‍यांना ९८६.२१ कोटी आणि रब्बीसाठी १७ हजार ६६३ शेतकर्‍यांना ७६.१८ कोटीचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.