शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ९१.३३ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 2:53 PM

पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी तब्बल ८७३ मिमी पाऊस पडल्याने बहुतांश सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गतवर्षी अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्येही अवघा १७ टक्के पाणीसाठा असताना यंदा मात्र जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये तब्बल ९१.३३ टक्के पाणीसाठा असल्याचे सुखद चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने प्रकल्पांतील पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्याने हे प्रकल्प भरण्यास मदत झाली असल्याचे बुलडाणा पाटबंधारे विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.दरम्यान, पाणी आरक्षण समितीची बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पिण्यासाठी किती पाणी आरक्षीत राहील व सिंचनासाठी किती पाणी उपलब्ध करण्यात येईल याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. मात्र यंदा प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ४३ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. यंदा जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सरासरी तब्बल ८७३ मिमी पाऊस पडल्याने बहुतांश सर्व प्रकल्प तुडूंब भरले आहे. २०१४ नंतर प्रथमच ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांमध्ये हा पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीचा विचार करता प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अवघा ४५०.४ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे प्रकल्प तहानलेलेच होते. यंदा मात्र तशी स्थिती नाही. जिल्ह्यातील प्रकल्पांचा विचार करता एकट्या पलढग प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल ११०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अन्य प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात त्या तुलनेत कमी पाऊस पडलेला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाDamधरण