एक मूठ धान्य व एक रुपया विद्रोहीसाठी

By Admin | Updated: January 11, 2015 00:19 IST2015-01-11T00:19:06+5:302015-01-11T00:19:06+5:30

चिखली येथील १३ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी धान्य व निधीचे संकलन.

For a bucket of grain and a rupee rebel | एक मूठ धान्य व एक रुपया विद्रोहीसाठी

एक मूठ धान्य व एक रुपया विद्रोहीसाठी

चिखली : 'मूठभर धान्य व एक रुपया विद्रोहीसाठी' अस नारा देत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्यावतीने बुलडाणा येथील जिजामाता महाविद्यालयात १७ व १८ जानेवारी रोजी जनतेच्या सहभागातून १३ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानुषंगाने ९ जानेवारी रोजी चिखली शहरात जनतेकडून धान्य आणि प्रत्येक एक रुपयाचा निधी संकलित करण्याची मोहीम राबविण्यात आली.
महात्मा फुलेंची सत्यशोधक भूमिका घेऊन पर्यायी समतावादी सभा, संमेलने विषमतावाद्यांच्या आङ्म्रयाने वा मेहरबानीने नाही, तर लोकारयाने, सामान्य जनतेच्या सहभागाने यशस्वी करण्याचा बाणा दाखवित विद्रोही मराठी साहित्य संमेलनासाठी 'एक मूठ धान्य आणि एक रुपया विद्रोहीसाठी, बहुजनांच्या आत्मसन्मानासाठी' हा नारा देत चिखली शहरात ९ जानेवारी रोजी निधी व धान्य संकलित केले.

Web Title: For a bucket of grain and a rupee rebel