संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

By Admin | Updated: May 13, 2014 22:00 IST2014-05-13T21:52:25+5:302014-05-13T22:00:45+5:30

युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त १२ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सामाजिक सभागृहात मराठा पाटील युवक समितीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

Blood donation camp for Sambhaji Rai Jayanti | संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

संभाजीराजे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

खामगाव : युवराज छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त १२ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज मराठा पाटील सामाजिक सभागृहात मराठा पाटील युवक समितीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले. तर उद्या १४ मे रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली व रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रम पार पडणार आहे. छत्रपती संभाजी जयंतीनिमित्त दरवर्षी मराठा पाटील युवक समितीच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात येत असते. यावर्षी सुध्दा शिबीर पार पडले. या शिबिरात जिल्हाध्यक्ष गजानन ढगे यांच्यासह श्रेणिक तारापूरे, सागर पेसोडे, विशाल सपकाळ, डिगांबर बोके, श्रीकृष्ण पाटील, अक्षय घोरपडे, अमोल गावंडे, नितेश गावंडे, सचिन ठाकरे, बाळू पाटील, गजानन चांभारे, पंकज गायगोळ, वैभव गायकवाड, अनिल मेतकर, हितेश शिंदे, हेमंत मुंढे, पवन राजपूत, योगेश महाकाळ, सतिष सोळंके, प्रवीण कदम, संतोष टाले, निलेश राजपूत, बाळू पाटील, खडसे, पंकज पाटील, नरेश भारसाकळे, प्रफुल पाटील, अभिजीत ढगे, राहुल मुंढे, हर्षल बुंदे, भूषण शिंदे, आकाश चवरे, सुरेश वतपाळ, श्रीधर ढगे आदींनी रक्तदान केले. यावेळी मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राजे संभाजी जयंतीनिमित्त लोकवर्गणीतून साकारलेली रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजू होणार असून उद्या सकाळी ९ वाजता मराठा पाटील सामाजिक सभागृह येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीचा सभागृहात समारोप होईल. रॅलीमध्ये मराठा पाटील युवक समिती, अ. भा. मराठा महासंघ, युवा मराठा ग्रुप, छावा संघटना, देशमुख समाजोन्नती मंडळ आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Web Title: Blood donation camp for Sambhaji Rai Jayanti