पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

By Admin | Updated: April 15, 2017 00:19 IST2017-04-15T00:19:18+5:302017-04-15T00:19:18+5:30

चिखली- पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.

For a bird conservation 'One nest binds to chai'! | पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’!

पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे, खाद्याची सोय

चिखली : भयानक उन्हाळा, वाढणारं तापमान आणि अक्षरश: करपून निघणारी वनराई. या सगळ्यात आपण स्वत:ला वाचवतो, पण पक्ष्यांचे काय? हा प्रश्न भेडसावल्याने इतक्या उष्णतेत व सिमेंटच्या जंगलातही पक्षी टिकून राहावेत व त्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी येथील डॉक्टर दाम्पत्य सरसावले असून, पक्षी संवर्धनासाठी ‘एक घरटं बांधा चिऊसाठी’ हा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे.
येथील स्माइल केअर डेन्टल क्लिनिकचे डॉ.युवराज सिरसाट व डॉ.सायली सिरसाट यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळयात बऱ्याचदा पक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्याचा मोठा फटका त्यांना बसत असतो. असे अनेक पक्षी मरतातही. त्यांना वाचवण्यासाठी सिरसाट दाम्पत्यांनी ९ एप्रिल रोजी जनमानसात जनजागृही व्हावी व पक्ष्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून स्थानिक चिखली मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात एका शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात खामगाव येथील पक्षीमित्र संजय गुरव यांनी वाढते प्रदूषण, मानवी अतिक्रमण, तापमान यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातही पक्ष्यांचा किलबिलाट फुलविण्यासाठी व पक्षी संवर्धनासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. या शिबिरस्थळी पक्ष्यांसाठी लागणारे पाण्याचे भांडे, घरे, खाद्यांची बॉटलचे आदी साहित्य अत्यल्प दरात पक्षीप्रेमींसाठी उपलब्ध करून देण्यात आले. शिबिराला नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, डॉ.संध्या कोठारी, डॉ.वाघ, डॉ.शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.योगेश काळे, संचालन डॉ.संदीप म्हस्के, तर आभार डॉ.युवराज सिरसाट यांनी मानले.

Web Title: For a bird conservation 'One nest binds to chai'!