शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यासाठी भजन आंदोलन

By admin | Updated: May 13, 2014 21:43 IST

रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी आज १३ मे रोजी हरसोडा येथील ग्रामस्थांनी दोन तास भजन आंदोलन केले.

मलकापूर : धुपेश्‍वर रस्ता तसेच वडोदा रस्ता मंजूर होवून सुध्दा सदर रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण व्हावे, या मागणीसाठी आज १३ मे रोजी अँड.हरिश रावळ यांचे नेतृत्वात हरसोडा येथील तेजराव रायपुरेसह ग्रामस्थांनी टाळ, मुदूंग, पेटी, विणा व झांज वाजवून सां.बा.विभागात दोन तास भजन आंदोलन केले. धुपेश्‍वर रस्ता हा मंजुर होवून ६ महिने उलटल्यावर सुध्दा ठेकेदार मजुरांना पैसे देत नाही म्हणून मजुर काम सोडून गेले. त्यामुळे रस्त्याचे काम प्रलंबित पडले. तसेच वडोदा येथील रस्ता सुध्दा प्रलंबित आहे. गावकर्‍यांचे या रस्त्यावर प्रचंड हाल होत आहे. सदरची कामे करावी याकरिता बरेचवेळा आंदोलन करुन सुध्दा ठेकेदार थोडेशे काम सोडून रस्ता अर्धवट सोडतो, अधिकारी गंभीरतेने या रस्त्याकडे लक्ष देत नाही. या अधिकार्‍यांना व ठेकेदारांना प्रसन्न करण्यासाठी शांततेचे मार्गाने धुपेश्‍वर संस्थान येथील तेजराव राजपुरे, सरपंच अंबादास रायपुरे, साहेबराव रायपुरे, राहुल जाधव यांचे नेतृत्वात दोन तास गावकर्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरजोरात भजने म्हटली. यावेळी रस्त्यावरील लोक आश्‍चर्यचकीत होवून या आंदोलनाला प्रोत्साहन देत होते. शेवटी अभियंता नवलकर, अभियंता जाधव यांनी सदर काम दोन दिवसात सुरु करतो असे आश्‍वासन दिल्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली. या आंदोलनात अँड. हरिष रावळ यांच्यासह राहुल जाधव, तेजराव रायपुरे, सरपंच अंबादास रायपुरे, पांडूरंग ताठे, साहेबराव रायपुरे, प्रकाश घुटे, अमृतराव देशमुख, भास्कर रायपुरे, नवृत्ती कहाते, श्रीकृष्ण रायपुरे, पुरुषोत्तम रायपुरे, भास्कर धांडे, लक्ष्मण कोलते, अशोक रायपुरे, सुरेश कोकाटे, रमेश झाल्टे, पंकज खापरे, निल रायपुरे, देविदास भोंडेकर, संजय चंदेलकर, प्रल्हाद झाल्टे, निना कांडेलकर, पर्वतराव झाल्टे, कलीम पटेल यांचेसह ग्रामीण भागातील असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला. जर दोन दिवसात काम सुरु केले नाही तर परिसरातील नागरिकांना घेवून धरणगांव येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलनाचा इशारा हरिश रावळ, तेजराव रायपुरे यांनी दिला आहे.