शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

चिखली तालुक्यातील बेराळा बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आल्याने अनेक ठिकाणी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होताना दिसून येत ...

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आल्याने अनेक ठिकाणी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली होताना दिसून येत आहे. या बेजबाबदारपणाचा फटका तालुक्यातील बेराळा या गावाला बसला आहे. अवघ्या १५०० लोकसंख्येच्या या गावात केवळ तीनच दिवसांत ३१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारी प्राप्त १५ अहवालांपैकी १३ रुग्ण बेराळा या गावाचे असल्याने चिंता वाढली आहे. तालुक्यातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या ही ४२ असून यातील ३१ बेराळा गावातील आहेत. सध्याच्या संचारबंदीलाही शहरात फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. पालिकेचे वाहन माघारी फिरताच दुकाने पुन्हा उघडली जात असल्याने वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे.

प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक उपाययोजना

बेराळा गावात अचानकपणे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने तालुका आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या गावातील कोरोनाबाधितांना आधार कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून गावात तीन दिवसांपासून तपासणी शिबिर घेऊन गावातील लहानांपासून मोठ्या व्यक्तीची कोरोना चाचणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे. गावात जंतुनाशक फवारणी केली जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि ग्रामपंचायत व पंचायत समितीमार्फत कंटेनमेंट अ‍ॅक्टिव्हिटी राबवून गावातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी इम्रान शेख यांनी दिली आहे.

ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा

गावात अचानकपणे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व रुग्ण रोखण्यासाठी योग्य पद्धतीने काम करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने ग्रामस्थांना केले आहे.