शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

गाठी-भेटी, आकडेमोडीत उमेदवार व्यस्त

By admin | Updated: October 17, 2014 00:39 IST

बुलडाणा जिल्ह्यातील सातही मतदारसंघांचा उमेदवारांनी घेतला आढावा.

बुलडाणा : मतदान संपल्यानंतर बुधवारी संध्याकाळीच उमेदवारांनी बुथनिहाय आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात केली होती. या आकडेवारीचे वेिषण, कार्यकर्त्यांसोबत चर्चा व निवडणूक काळात मदत करणार्‍या लोकांचे आभार व्यक्त करण्यासाठी गाठी-भेटी घेण्या तच गुरुवारी उमेदवार व्यस्त होते. बुलडाणा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विजयराज शिंदे यांनी आज सकाळपासून निवडणुकीमध्ये मदत करणार्‍या शहरातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. राहत्या घराशेजारी अनेकांच्या घरी जाऊन आभार मानले व दुपारी बुथनिहाय आकडेवारी घेऊन ठराविक कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्याचे दिसून आले. काँग्रेसचे उमेदवार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. गावागावातून मतदानाच्या आकडेवारीबाबत चर्चा करत दुपारी ते स्वत:च्या घराचे सुरू असलेले बांधकाम पाहण्यासाठी गेले. भाजपचे उमेदवार योगेंद्र गोडे यांनी कालच बुथनिहाय आकडेवारीनुसार कार्यकर्त्यांशी चर्चा केली होती. आज मतदारसंघातील अनेक गावांमधून त्यांच्याकडे कार्यक र्ते आले होते. दुपारपर्यंत त्यांच्याशी चर्चा करत ते आभार व्यक्त करीत होते. मनसेचे संजय गायकवाड यांच्याकडे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठय़ा प्रमाणात दिसून आला. इंजिन जोरात चालले, असाच कार्यकर्त्यांचा सूर होता. तर राष्ट्रवादीचे नरेश शेळके यांनी पदाधिकार्‍यांसोब त चर्चा करून बुथनिहाय मतदानाचा अंदाज घेतला. खामगाव मतदारसंघात काँग्रेसचे दिलीपकुमार सानंदा यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांचा दिवस व्यस्त होता. तर भाजपचे अँड.आकाश फुंडकर हे गावागावातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसून आले. जळगाव जामोदमध्ये डॉ.संजय कुटे यांनी दुपारपर्यंंत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून जिल्हाध्यक्ष या नात्याने भाज पच्या इतर मतदारसंघातील उमेदवारांसोबत फोनद्वारे चर्चा केली. काँग्रेसचे रामविजय बुरुंगले यांनी त्यांचे बंधू शिवाजीराव बुरुंगले यांच्यासह मतदारांचे आभार मानण्यासाठी गाठी-भेटी घेतल्या. भारिप-बमसंचे प्रसेनजित पाटील यांनी कार्यालयात बसून सर्व कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधला आणि मतमोजणीच्या दिवशीचे नियोजन केल्याचे सांगि तले.मेहकर मतदारसंघात शिवसेनेचे डॉ.संजय रायमुलकर यांनी जगदंबा देवीच्या महाप्रसाद वि तरणाला हजेरी लावून तेथेच मतदारांशी संवाद साधला. काँग्रेसचे लक्ष्मणदादा घुमरे, राष्ट्रवादीच्या अश्‍विनीताई आखाडे यांनीही निवडणुकीत मदत करणार्‍यांचे धन्यवाद व्यक्त करण्यासाठी गाठीभेटी घेतल्या. सिंदखेडराजा मतदारसंघात शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मतदारसंघातील विविध गावांना भेटी देत आढावा घेतला. मनसेचे विनोद वाघ हे सकाळपासून तरुणांच्या गराड्यात मतदानाचा कौल जाणून घेत होते. राष्ट्रवादीच्या रेखाताई खेडेकर, भाजपचे डॉ.गणेश मान्टे व काँग्रेसचे प्रदीप नागरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मलकापूर मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ.अरविंद कोलते यांनी विविध गावांना भेटी देऊन चर्चा केल्याचे दिसून आले. जवळपास सर्वच मतदारसंघात उमेदवारांनी मतदानाच्या आकडेवारीचे वेिषण केले. अनेक उमेदवारांसोबत संपर्क होऊ शकला नाही; मात्र सर्वांनीच गाठीभेटी घे त आजचा दिवस व्यस्त ठेवल्याचे जाणवले.