शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वेळीच द्या विसरण्याच्या सवयीकडे लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 03:17 IST

वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे.

मुंबई : वय वाढले की विसरभोळेपणा वाढतो. मात्र या विसरभोळेपणाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे, कारण अजूनही बऱ्याच कुटुंबांमध्ये विसरभोळेपणा हा अल्झायमरचा प्राथमिक टप्पा असल्याविषयी अज्ञान आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये विसरभोळेपणा आल्यास ही लक्षणे वेळीच ओळखण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. २१ सप्टेंबर या जागतिक अल्झायमर दिनाच्या निमित्ताने ही जनजागृती समाजाच्या विविध घटकांत होणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.स्मरणशक्ती व आकलनशक्तीशी प्रामुख्याने संबंधित असलेला ‘अल्झायमर’ हा आजार वृद्धावस्थेत संभवतो. हा आजार असाध्य असला तरी काही प्रतिबंधक उपायांनी तो होऊ नये यासाठी प्रयत्न करता येतो, अशी माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी दिली. तर याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, ६५ वर्षे वयानंतर २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे. या आजाराच्या पहिल्या टप्प्यात स्वत:चे नाव विसरण्यापासून सुरुवात होते. त्यानंतर हळूहळू अवतीभवतीच्या परिस्थितीचे भान न राहणे, नित्य परिचितांची नावे विसरणे, पैशाची देवघेव करताना फारच गोंधळून जाणे, सामान्य गोष्टींचा निर्णय न होणे, कोणत्याही नावीन्याबद्दल अनास्था वाटणे, विचारविश्वांत गुरफटून राहणे, बोलताना शब्द न आठवल्याने अडखळणे, पोशाखाबाबत आवश्यक नेटकेपणाही नसणे इत्यादी लक्षणे सामान्यत: अल्झायमर झालेल्यांमध्ये दिसून येतात. याशिवाय अंतिम अवस्थेमध्ये मलमूत्र विसर्जनाबाबतही भान सुटणे हे अत्यंत विदारक, दयनीय लक्षण असू शकते, असेही त्यांनी सांगितले.>कुटुंबीयांचे समुपदेशन महत्त्वाचे!याविषयी उपचार प्रक्रियेविषयी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कुशल भरवारे यांनी सांगितले, या आजारात मेंदूमध्ये अ‍ॅसिटिलकोलीन हे रसायन वाढविणारी औषधे दिले जाते. तसेच ग्लुटामेट हे रसायन कमी करणारी औषधेदेखील उपयोगी पडतात. तसेच, कुटुंबीयांचे समुपदेशन हासुद्धा महत्त्वाचा भाग असतो. कारण त्यांच्या मनाची तयारी करणे, त्यांना आजाराविषयी शिकविणे, रुग्णाच्या मर्यादा समजून घेण्याची त्यांची क्षमता वाढविणे, याखेरीज रुग्णाची काळजी घेणाºया व्यक्तीला प्रशिक्षण देणे गरजेचे असते.घरामध्ये व्यवस्था व आखणी बदलणे- उदा. रुग्ण वस्तू कुठे ठेवल्यात ते विसरतो, म्हणून त्याच्या कपाटांना पाट्या लावणे. अशा सगळ्या उपचार पद्धतीमुळे ‘अल्झायमर’ या आजाराचे निदान जर लवकर होऊ शकले तर त्यावर उपचार करता येतो, यामुळे रुग्णाचा बुद्धीचा ºहास आपण रोखू शकतो व त्याचे आणि त्याच्या नातेवाइकांचे आयुष्य आपण सुकर करू शकतो.