कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठांची ‘मान’ सोडविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 6, 2014 00:09 IST2014-12-06T00:09:06+5:302014-12-06T00:09:06+5:30

निकृष्ट पोषण आहार प्रकरण : बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या उलट्या बोंबा.

Attempts to solve the 'honor' of the senior officers by sacrificing the juniors | कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठांची ‘मान’ सोडविण्याचा प्रयत्न

कनिष्ठांचा बळी देऊन वरिष्ठांची ‘मान’ सोडविण्याचा प्रयत्न

चिखली (बुलडाणा) : अंगणवाडी पोषण आहाराच्या दर्जाबाबत निर्माण झालेल्या गोंधळाला निस्तरण्याऐवजी संबंधित कार्यालयाने आपली जबाबदारी झटकून कनिष्ठ कर्मचार्‍यांवर कागदी कारवाई करीत, चरायला वरिष्ठ आणि मरायला कनिष्ठ अशा वृत्तीचे प्रदर्शन घडविले आहे.
तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांवर ३ ते ६ वष्रे वयोगटातील बालकांना द्यावयाच्या पोषण आहारामध्ये अक्षरश: कुजके कडधान्य खाऊ घातल्या जात असल्याचे प्रकरण माध्यमांनी गेल्या आठ दिवसांपासून लावून धरले आहे. यामुळेच एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाने तालु क्यातील अंगणवाड्यांमध्ये सद्य:स्थितीत असलेल्या पोषण आहाराच्या साठय़ाचे पंचासमक्ष पंचनामे करून अहवाल बोलविला आहे.
दरम्यान, पोषण आहारातील कडधान्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर सेविकांनी या धान्याच्या दर्जाबद्दल त्यांनी संबंधित कार्यालयास लेखी का कळविले नाही, अशा प्रकारची दमदाटी संबंधित विभागाकडून कनिष्ठ कर्मचार्‍यांवर केली जाते. वास्तविक सेविकांकडून अनेकदा तक्रारी झाल्याचे दाखले गावकर्‍यांनीही दिले आहेत; मात्र वरिष्ठ कार्यालयानेच या तक्रारींना गांभीर्याने घेतले नाही. देयकांबाबतसुद्धा असा प्रकार घडणे अभिप्रेत असताना वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हितसंबंधातून पुरवठादाराची मर्जी सांभाळण्यास व त्यांची देयके वेळेत अदा करण्यास संबंधित विभाग का तत्परता दाखवतो, हा प्रश्न आहे.

Web Title: Attempts to solve the 'honor' of the senior officers by sacrificing the juniors