शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मंडळ अधिकारी व पोलिस कर्मचा-यास जिवे मारण्याचा प्रयत्न

By admin | Updated: March 11, 2017 01:34 IST

अवैध गौण खनिज उत्खनन;तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बुलडाणा, दि. १0- अवैध गौण खनिज उत्खनन करुन वाहतूक करणार्‍या टोळीस अडविणार्‍या मंडळ अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांवर ट्रॅक्टर चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३0 वाजता घडली. याप्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.बुलडाणा तालुक्यातील कोलवड येथील लालमाती परिसरात अवैध मुरुम उत्खनन करुन वाहतूक होत असल्याबाबत मंडळ अधिकारी शैलेश गिरी यांना भ्रमणध्वनीवरुन माहिती मिळाल्यावरुन ते नायब तहसीलदार एस.एच.भांबळे हे गुरुवारी रात्री ८.३0 वा. घटनास्थळी पोहचले. तेथे त्यांना एक जेसीबी खोदकाम करीत असताना तसेच दोन ट्रॅक्टर मुरुम वाहतूक करीत असताना आढळून आले. मंडळ अधिकारी यांनी त्यांना गौण खनिज परवानगीबाबत विचारणा केली असता वाहतूक पास आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी जेसीबी मशीन व ट्रॅक्टर वाहने पोलीस ठाण्यात नेण्याबाबत सांगितले. मात्र ट्रॅक्टर चालकाने त्याचे ट्रॅक्टर (एमएच २८-टी ९२६६) मंडळ अधिकारी यांचे अंगावर घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून लगेच बाजूला झाल्यामुळे मंडळ अधिकारी थोडक्यात बचावले. दरम्यान ट्रॅक्टरचालक ट्रकर घेऊन पळून जात असताना त्यांचा पाठलाग पोलीस नायक महादेव इंगळे यांनी केला असता ट्रॅक्टरचालकाने त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. मात्र इंगळे हे सावध होऊन बाजूला झाल्याने त्यांचे प्राण वाचले. घटनास्थळावरुन प्रमोद साहेबराव उबरहंडे, (१९ ), रा.भादोला वाडी व अमोल पुंजाजी उबरहंडे, रा.भादोलावाडी हे दोघे पळून जात असताना दोघांना ताब्यात घेतले. मंडळ अधिकार्‍याच्या अंगावर ट्रॅक्टर चालवून त्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या सतिष चिंतामण जाधव, रा.कोलवड, ता.जि.बुलडाणा यालादेखील ताब्यात घेतले. तीनही आरोपींविरुद्ध बुलडाणा पोलिसांनी भादंवि कलम ३0७ व १८६, तथा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ नुसार गुन्हा दाखल केला.