चिखलीत पत्रकारावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:35 IST2021-04-27T04:35:30+5:302021-04-27T04:35:30+5:30

येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी असलेले शेख समीर शेख फिरोज यांनी इंदिरा नगरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची बातमी २ ...

Attack on a muddy journalist | चिखलीत पत्रकारावर हल्ला

चिखलीत पत्रकारावर हल्ला

येथील एका वृत्तपत्राचे प्रतिनिधी असलेले शेख समीर शेख फिरोज यांनी इंदिरा नगरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याची बातमी २ महिन्यांपूर्वी प्रकाशित केली होती. दरम्यान, २५ एप्रिलला सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास ते घराबाहेर उभे असताना इंदिरा नगरातीलच सैयद सोईल सैयद कमरू याने तू बातमी का छापली असे म्हणत वाद घातला व हातातील कटर गळ्यावर टेकवले असता शेख समीर यांनी त्याला झटका देत थेट पोलीस स्टेशन गाठून प्रकरणाची तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सैयद सोईल सैयद कमरू याच्यावर यापूवीर्ही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, सैयद सोईल हा मनोरुग्ण असून त्याच्याकडे मनोरुग्ण असल्याचे प्रमाणपत्रही असल्याने त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात यावे, अशी मागणीही पत्रकार शेख समीर यांनी केली आहे.

Web Title: Attack on a muddy journalist