शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

‘श्रीं’च्या पालखीचे बुलडाणा जिल्ह्यात आगमन

By admin | Updated: August 14, 2015 00:19 IST

सिंदखेडराजा येथे प्रवेशद्वारावर हजारो भक्तांनी घेतले दर्शन.

सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): आषाढी यात्रा आटोपून पंढरपूरच्या विठुमाउलीचे दर्शन घेऊन परत निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले. मराठवाडा-विदर्भाच्या सीमेवर माळ सावरगावच्या घाटात आ.डॉ. शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, जगन सहाणे, गजानन तांबेकर, संवर्ग विकास अधिकारी चंद्रशेखर चेके, दिलीप आढाव, आतीश तायडे यांनी दिंडीचे स्वागत केले. मातृतीर्थ सिंदखेडराजानगरीच्या प्रवेशद्वारावर नगराध्यक्ष नंदाताई विष्णू मेहेत्रे यांनी पुष्प अर्पण करून पालखीचे स्वागत केले. शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांची दिंडी जालना मुक्काम आटोपून विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या माळसावरगाव शिवारात पोहचली. येथे आगमन होताच दिंडीतील सर्व वारकर्‍यांनी श्री संत गजानन महाराजांचा जयघोष करीत ह्यह्यगण गण गणात बोतेह्णह्ण च्या निनादात टाळमृदंगाच्या तालावर बेधुंद होऊन पावली खेळली. विदर्भाच्या प्रवेशद्वारावर हजारो भाविक भक्तांनी पालखीचे स्वागत करुन श्रींचे दर्शन घेतले. माळसावरगाव, तुळजापूर, नशिराबाद, अंचली येथील ग्रामस्थांनी दिंडीतील वारकर्‍यांना चहा, फराळ वाटप केले. तसेच स्थानिक जिजामाता अध्यापक विद्यालय, जिजाऊसृष्टी, मोती तलाव, संत भगवान बाबा कला विद्यालय तसेच टी पॉईंटवर भाविकांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.