शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
2
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
3
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
4
चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!
5
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
6
"ट्रम्प ब्रँड विषारी झालाय" म्हणत ट्रम्प टॉवरचा प्रकल्पच गुंडाळला; ऑस्ट्रेलियात बिल्डरकडून 'करेक्ट कार्यक्रम'
7
अजब-गजब सवय... गेली ८ वर्ष एकच अंडरवेयर घालून खेळतोय ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू एडरसन
8
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
9
फ्री वायफायच्या नादात चुकूनही करू नका 'हे' काम; अन्यथा एका मिनिटात बँक बॅलन्स होईल झिरो!
10
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
11
Palmistry: सरकारी नोकरी, खाजगी नोकरी की व्यवसाय? तुमच्या हातावरील रेषा काय सांगतात? 
12
Video - १ कोटीची नोकरी सोडून अपार्टमेंट्समध्ये करते साफसफाई; म्हणाली, "पैसा म्हणजे स्वातंत्र्य"
13
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
14
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
15
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
16
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
17
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
18
तामिळनाडूत मोठ्ठा 'खेला', ११८ साठी झगडणाऱ्या विजय यांना बहुमत चाचणीत १४४ आमदारांचा पाठिंबा! काय घडलं?
19
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
Daily Top 2Weekly Top 5

दोन वस्त्यांवर सशस्त्र दरोडा

By admin | Updated: June 26, 2014 02:04 IST

देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील घटना: सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

देऊळगावराजा : गाव शिवारात असलेल्या दोन वस्त्यांवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करुन झोपेत असलेल्या महिला-पुरुषांना गंभीर मारहाण करून २ लाख २३ हजार ८00 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदर घटना मंगळवारी रात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अंढेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. या घटनेतील पाच गंभीर जखमींना औरंगाबाद हलविले आहे.
देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या डोंगराजवळ असलेले स्टोन क्रशर आणि बायगाव शिवारात असलेल्या डोंगराजवळच्या वस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. स्टोन क्रशरजवळ सुखदेव झिपा राठोड (वय ४५), बेबी सुखदेव राठोड (वय ४0) हे पती-पत्नी घराच्या अंगणात बाहेर झोपलेले असताना त्यांच्यावर दरोडेखोरांनी लाठय़ाकाठय़ांनी हल्ला चढवून गंभीर मारहाण केली; तसेच बेबी राठोड यांच्या अंगावरील मंगळसूत्र रिंग फूल, मोबाईलसह ४१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर डोंगराजवळ असलेल्या माजी सैनिक शिवाजी इंगळे यांच्या शेतातील घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. त्याठिकाणी कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. दरोडेखोरांनी घराची झड ती घेऊन महिलांच्या अंगावरील दागिने, नगदी रक्कम ८७ हजार रुपये, सेव्हनपीस १0 हजार रुपये, गहुपोत ३0 हजार रुपये, पाटल्या १५ हजार, एकदाणी टापूस ४0 हजार रुपये असा एकूण १ लाख ८२ हजार रुपये वरील दोन्ही घटनेत एकूण मुद्देमाल २ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी घेऊन पलायन केले.
घटनेनंतर सुखदेव राठोड आणि शिवाजी इंगळे यांनी जखमी अवस्थेत पो.स्टे.मध्ये येऊन माहिती दिली. अंढेरा पोलिसांनी वरिष्ठांना ही माहिती दिल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक श्याम दीघावकर, एसडीपीओ प्रवीण परदेशी यांनी जिल्ह्यात नाकाबंदी करुन घटनास्थळ परिसरात कोम्बींग ऑ परेशन राबवले. बुधवारी सकाळी श्‍वान राजाने अंढेरा गावाकडे मार्ग दाखवला. किनगाव राजा, लोणार, जानेफळ, अमडापूर, सिं.राजा, साखरखेर्डा आणि दे.राजा या पो.स्टे.चे ठाणेदार व कर्मचारी हजर झाल्याने अंढेरा पोलिस स्टेशनला छावणीचे स्वरूप आले आहे. या घटनेतील गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर औरंगाबादला हलविण्यात आले आहे.