गारपीटग्रस्तांना आणखी १0 कोटीचे अनुदान

By Admin | Updated: May 25, 2014 00:05 IST2014-05-24T21:09:59+5:302014-05-25T00:05:54+5:30

गारपीटग्रस्तांसाठी आणखी १0 कोटीचे अनुदान खामगाव तालुक्यातील उर्वरित ९१ गावांना प्राप्त झाले आहे.

Another 10 crores grant for hailstorm affected | गारपीटग्रस्तांना आणखी १0 कोटीचे अनुदान

गारपीटग्रस्तांना आणखी १0 कोटीचे अनुदान

खामगाव : गारपीटग्रस्तांच्या नुकसानीची भरपाई म्हणून आणखी १0 कोटीचे अनुदान तालुक्यातील उर्वरित ९१ गावांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या अनुदानाचा लाभ दिल्या जाणार आहे. गेल्या फेब्रुवारी, मार्चमध्ये जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून कोरडवाहूसाठी हेक्टरी १0 हजार, रब्बीसाठी १५ हजार तर फळबागसाठी २५ हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. खामगाव तालुक्यातील १२ हजाराहून अधिक शेतकर्‍यांच्या शेतातील रब्बी पिकाचे नुकसान झाले होते. त्यानुसार खामगाव तहसीलला पहिला हप्ता सव्वा आठ कोटींचा प्राप्त झाला होता. यामध्ये नुकसानग्रस्त १४१ गावांमधील अतिनुकसान झालेल्या ५0 गावातील लाभार्थ्यांना या अनुदानाचे वाटप करण्यात आले. उर्वरित ९१ गावातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना आता या १0 कोटीमधून वाटप होणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात मिळणार्‍या अनुदानातून सर्वच नुकसानग्रस्त लाभ मिळणार आहे.

Web Title: Another 10 crores grant for hailstorm affected