शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका,मदतनिसांची होरपळ

By admin | Updated: August 19, 2015 01:50 IST

एप्रिलपासून मानधन नाही ; कर्मचा-यांनाही वेतनाची प्रतीक्षा.

बुलडाणा : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस जवळपास चार ते पाच महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांवर उपासमारीची वेळ आली असून, बालविकास प्रकल्प कार्यालयाचेही लाखो रुपये थकीत असल्यामुळे कर्मचार्‍यांनाही वेतनाची प्रतीक्षा आहे.अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या अनेक मागण्या कित्येक दिवसांपासून शासन दरबारी प्रलंबित राहत आहेत. त्यातच जिल्ह्यातील २ हजार ५00 अंगणवाडी सेविका व २ हजार ५00 अंगणवाडी मदतनिस कार्यरत आहेत; मात्र त्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन न मिळाल्याने उपासमार सुरू आहे. मानधन मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी वेळोवेळी मोर्चा व आंदोलने केली आहेत; तरीसुद्धा त्यांच्या मागण्या दुर्लक्षितच राहत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील अंगणवाड्यावर देखरेख करण्यासाठी बालविकास प्रकल्प कार्यालये आहेत. या प्रकल्प कार्यालयीन कर्मचार्‍यांचेही लाखो रुपये थकीत आहे. कर्मचार्‍यांना जवळपास तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सणासुदीचे दिवस असल्याने सण साजरा करण्यासाठी कर्मचार्‍यांना उधारीत व्यवहार करावे लागत आहेत, तरी वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन कर्मचार्‍यांचे थकीत दीड कोटी रुपये तत्काळ द्यावे, अशी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच कर्मचार्‍यांमधून होत आहे.