आंबेडकर जयंतीची मिरवणूक

By Admin | Updated: April 14, 2017 13:33 IST2017-04-14T13:33:51+5:302017-04-14T13:33:51+5:30

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह भरउन्हातही दिसून आला.

Ambedkar Jayanti procession | आंबेडकर जयंतीची मिरवणूक

आंबेडकर जयंतीची मिरवणूक

खामगाव: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह भरउन्हातही दिसून आला. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळी मानवंदनेचा कार्यक्रम पार पडला. यानंतर शहरातील विविध भागात असलेल्या बुध्दविहारांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. तर दुपारी २ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. शहरातील तापमान जिल्ह्यात उच्चांक गाठणारे असतानाही उन्हात निघालेल्या मिरवणुकीत शहरातील आबाल-वृध्दांसोबतच चिमुकले सुध्दा सहभागी झाले होते.

Web Title: Ambedkar Jayanti procession