शेती साहित्य जळून खाक; सात लाखांचे नुकसान

By Admin | Updated: April 25, 2017 00:30 IST2017-04-25T00:30:14+5:302017-04-25T00:30:14+5:30

लोणार- शहरातील भीमराव नामदेव मापारी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवलेल्या शेती साहित्याला २३ एप्रिलच्या रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान आग लागून नुकसान झाले.

Agricultural material burnt to the ground; Loss of seven lakh | शेती साहित्य जळून खाक; सात लाखांचे नुकसान

शेती साहित्य जळून खाक; सात लाखांचे नुकसान

लोणार : शहरातील भीमराव नामदेव मापारी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाखाली ठेवलेल्या शेती साहित्याला २३ एप्रिलच्या रात्री ८ ते ९ वाजताच्या दरम्यान आग लागून ७ लाख ६५ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड यांनी सांगितले.
लोणार शहरात भीमराव नामदेव मापारी यांची सर्व्हे नं.३४२/२ मध्ये शेती आहे. शेतकरी भीमराव मापारी २३ एप्रिल रोजी रोजच्याप्रमाणे सायकांळी शेतातील कामे आटोपून घराकडे गेले होते. त्यारात्री शेताकडे जाणाऱ्या काही शेतकऱ्यांना भीमराव मापारी यांच्या शेतात आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी सदर प्रकार लगेच दूरध्वनीवरून मापारी यांना कळविला.
मात्र, शेतात जाईपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आजूबाजूला पाणी उपलब्ध नसल्याने आणि विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे आग विझविता आली नाही. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भूषण मापारी यांनी रात्रीच घटनास्थळी जाऊन भेट दिली. सदर घटनेबाबत त्यांनी तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड, तलाठी अशोक सौदर व लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊसाहेब सातपुते यांना कळविले. पोलीस अधिकारी यांनी रात्रीच्या वेळी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. २४ एप्रिल रोजी सकाळीच तालुका कृषि अधिकारी बिपीन राठोड यांनी कृषि सहायक दतात्रय गर्गे यांना शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानाच्या पंचनाम्यासाठी घटनास्थळी पाठविले. यावेळी काँग्रेसचे कांता पाटील, तलाठी अशोक सौदर, भीमराव मापारी, नागेश मापारी, रवींद्र मापारी उपस्थित होते. पंचनामा केला असता आग लागून ७ लाख ६५ हजार ३५० रुपयांचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी बिपीन राठोड यांनी सांगितले.

Web Title: Agricultural material burnt to the ground; Loss of seven lakh