शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतर दारू विक्रीचे ‘मार्ग’ बदलले!

By admin | Updated: April 18, 2017 01:08 IST

न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

- स्टिंग आॅपरेशनबुलडाणा : महामार्गावरील व ५०० मीटरच्या परिघातील दारू विक्रीची दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद झाली असली, तरी आता गल्लीबोळात आणि जागोजागी अवैधरीत्या दारू विक्री सुरू झालेली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपेरशनमध्ये जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने सुरू असलेली दारू विक्री उघड झाली. महामार्गावर वाढत्या अपघाताला दारू जबाबदार आहे, या संदर्भाची सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेत सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारू विक्री बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे ५०० मीटरच्या आत असलेले जिल्ह्यातील ३६१ वाईन शॉप, बीअर बार १ एप्रिलपासून बंद करण्यात आले.शासनाच्या या निर्णयामुळे नियमित बसणाऱ्यांची मात्र पंचाईत झाली शिवाय दारू व्यावसायिकांनाही तोटा सहन करावा लागत आहे. दारू दुकाने बंद झाल्यानंतर शहरात दारूची अवैध विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून, काळ्याबाजारात दारू चढ्या भावाने विकली जात आहे. सदर दारू विक्रीची ठिकाणे शोधून काढण्यासाठी ‘लोकमत’च्या पथकाने रविवार, १६ एप्रिल रोजी बुलडाणा व मेहकर शहर व ग्रामीण परिसरात स्टिंग आॅपरेशन केले असता ग्रामीण क्षेत्रातील किराणा दुकान, सुनसान रस्ते, आडोशाला असलेल्या टपऱ्या, मोकळे मैदान तसेच बसस्थानक परिसर व शहरातील विविध वस्त्यांमध्ये दिवसाला व रात्रीच्या वेळी दारूची छुप्या मार्गाने विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. शिवाय बऱ्याच ठिकाणी दारू व गुटख्याची घरपोच सेवा दिली जात असल्याचे उघड झाले.मेहकर उपविभागात खुलेआम दारू विक्रीमेहकर उपविभागात येणाऱ्या मेहकर, डोणगाव, जानेफळ, लोणार व साखरखेर्डा या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही गावामध्ये गावरान हातभट्टीची दारु, देशी तसेच विदेशी दारूची जादा भावाने मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. उपविभागातील सोनाटी, उकाळी-सुकळी, चायगाव, हिवरा आश्रम, कळंबेश्वर, अंजनी खुर्द, सुलतानपूर, अंजनी बु. लोणी गवळी, मोळा, लावणा, शेलगाव देशमुख, आंधृड, चिंचाळा, जनुना, बेलगाव, विश्वी, आरेगाव, घाटबोरी, उमरा देशमुख, उटी, मुंदेफळ, हिवरा खुर्द, लोणी काळे, सावत्रा, वरवंड, मारोती पेठ, माळेगाव, सोनार गव्हाण, घुटी, पार्डी, पाचला, शेंदला, मोळी, पिंप्रीमाळी, वेणी, देऊळगाव माळी, वडाळी, पारखेड, मोहना मांडवा, पाथर्डी, बोथासह आदी गावांमध्ये गावरान, देशी दारूची अवैध विक्रीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सध्या न्यायालयाच्या आदेशानुसार दारुची विक्री बंद आहे. तसेच नियमापेक्षा जादा दराने दारु विक्री करु नये, मात्र जर कोणी जादा दराने दारु विक्री करीत असेल, तर त्यांचेवर तत्काळ कारवाई करण्यात येईल.- जी.आर. गावंडे, दारुबंदी अधिकारी उपविभाग, मेहकर