शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रशासन बेजबाबदार

By admin | Updated: September 28, 2014 00:20 IST

शेगाव रेल्वेस्थानक, तहसील कार्यालय व बसस्थानक येथे लोकमतचे स्टिंग ऑपरेशन.

शेगाव: कार्यालयाच्या आवारात, दालनासमोर तसेच दर्शनी भागात ठेवलेल्या बेवारस वस्तूंकडे अधिकारी-कर्मचारी, नागरिक बिनदिक्कतपणे पाहतात; पण ही वस्तू कोणाची, इथे का ठेवली, त्यात काय आहे, असे दुर्लक्ष जीवावर बेतेल काय, याचा तसुभरही संशय घेत नाहीत. लोकमत चमूने शुक्रवारी खामगाव बसस्थानक, नांदुरा रेल्वे स्थानक तसेच शेगाव येथे रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि तहसील कार्यालयात टिफीन डबे ठेवले. खूप वेळ ठेवलेल्या या डब्यांकडे पाहण्याशिवाय दुसरी कोणतीही कृती कुणीही केल्याचे आढळले नाही. त्यावरून अधिकारी, कर्मचारी, नागरिकांत जागरूकतेचा अभाव असल्याचे लोकमत स्टिंग ऑपरेशननंतर समोर आले आहे.रेल्वे स्टेशन, बसस्थानक तसेच तहसील कार्यालयात एक टिफीन ठेवण्यात आला होता. शासकीय इमारतीच्या कार्यालयात डबा ओलांडून दुर्लक्ष करीत कर्मचार्‍यांनी आत प्रवेश केला. तर रेल्वे स्थानक, बस स्थानक या सार्वजनिक ठिकाणी पोलिस प्रशासन, एस. टी. व रेल्वेचे कर्मचारी किंवा कुठल्याही नागरिकाने याबाबत सतर्कता दाखविली नाही. रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र .१ व २ वर सर्वप्रथम पोलिस कर्मचार्‍यांच्या नजरा चुकवून टिफीन-डबा दुपारी ११:0५ वाजण्याच्या सुमारास ठेवला. अनेक अधिकारी-कर्मचारी व प्रवासी या टिफीनकडे पाहत तेथून जात होते; मात्र कोणालाही हा टिफीन दिसला नाही. आरपीएफ आणि जीआरपी पोलिस कर्मचार्‍यांनी या डब्याच्या जवळुन अनेकवेळा चकरा मारल्या; मात्र या डब्यामध्ये काही संशयास्पद वस्तू असू शकते, याचा विचार कुणीही केला नाही. प्रवाश्यांनीही बेवारस वस्तु पोलिसांच्या लक्षात आणून देण्याचे कर्तव्य पार पाडले नाही.बसस्थानकातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर टिफीन ठेवले; मात्र बस स्थानकात भरपूर गर्दी अस तंनासुध्दा प्रवासी किंवा कुठल्याही एस. टी. कर्मचार्‍यांचे लक्ष या बेवारस टिफीनकडे गेले नाही. यावेळी चौकशी कक्षांच्या खिडकी जवळ अर्धा तास डबा पडलेला होता. एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाय योजना राबवित आहे. एस टी बसेस मध्ये ही बेवारस वस्तुबाबत ही दर्शनी भागात फलके लावण्यात आलेली आहे; मात्र बसस्थानकात एवढय़ा मोठय़ा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या समक्ष बेवारस डबे बस स्थानकात पडून राहतात व याकडे त्यांचे लक्ष जात नाही. याबाबत आश्‍चर्यच म्हणावे लागेल.