कुपोषणमुक्तीसोबतच जलयुक्त शिवाराला प्राधान्य

By Admin | Updated: January 17, 2015 00:15 IST2015-01-17T00:15:22+5:302015-01-17T00:15:22+5:30

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांची ग्वाही.

In addition to malnutrition, water tanker Shivara prefer | कुपोषणमुक्तीसोबतच जलयुक्त शिवाराला प्राधान्य

कुपोषणमुक्तीसोबतच जलयुक्त शिवाराला प्राधान्य

बुलडाणा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्यशासन उपाययोजना करीत असून, जिल्हा परिषदेच्या मार्फतही या अभियानासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. जलयुक्तशिवार ही योजना प्रभावीपणे राबविताना कुपोषण मुक्तीला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.
बुलडाणा जिल्हा परिषदेचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. जलयुक्त शिवार अभियानात गावांची निवड झाली आहे. आता या कामाला अधिक गती देण्याची गरज आहे. जलसंधारणाची कामे जिल्हाभरात खूप मोठय़ा प्रमाणात झाल्याची मला माहिती मिळाली आहे, त्यामुळे आगामी काळात जलयुक्तशिवार योजना राबविताना अडचणी येणार नाहीत, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर जिल्ह्यात मी उपविभागीय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. माझ्या कामाचा भाग नसतानाही कुपोषणमुक्तीसाठी अनेक योजनांना गतिमान केले, त्यामुळे जिल्हा परिषदेसारख्या ग्रामीण यंत्रणेत आता या विषयावर लक्ष केंद्रित करणार आहे. कुपोषण मुक्तीसाठी अनेक चांगल्या योजना आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही, याची जाण असल्याने सर्व अधिकार्‍यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

*पहिल्याच दिवशी घेतला कामाचा आढावा
मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून शुक्रवारी रूजू होताच दीपा मुधोळ यांनी सर्व खातेप्रमुखांची बैठक घेऊन जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयीन शिस्त व स्वच्छता यावर भर देतानाच नियोजित वेळेत कामे पूर्ण होतील, असा प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी खातेप्रमुखांना दिले.

Web Title: In addition to malnutrition, water tanker Shivara prefer