वर्‍हाडाच्या वाहनाला अपघात; एक ठार

By Admin | Updated: May 20, 2014 00:40 IST2014-05-20T00:01:47+5:302014-05-20T00:40:35+5:30

लोणार तालुक्यातील वर्‍हाडाच्या वाहनाला झालेल्या अपघातात १५ वर्षीय मुलगा ठार तर तीन जखमी.

Accident of Harvada vehicle; One killed | वर्‍हाडाच्या वाहनाला अपघात; एक ठार

वर्‍हाडाच्या वाहनाला अपघात; एक ठार

लोणार : तालुक्यातील भुमराळा येथील लग्नाचे वर्‍हाड येवती येथे घेऊन जाणार्‍या वाहनाला रेती वाहतूक करणार्‍या टिप्परने जोरदार धडक दिली. यामध्ये वर्‍हाडाच्या गाडीत असलेला १५ वर्षीय मुलगा ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात आज १९ मे रोजी देऊळगाव कुंडपाळ जवळ घडला आहे. भुमराळा येथील लग्नाचे वर्‍हाड एम. एच. २८ एच. ८१0५ क्रमांकाच्या पिकअप गाडीला भरधाव वेगाने रेती वाहतूक करणार्‍या डोणगाव येथील एम.एच. २८ बी. ८७0७ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वर्‍हाडाच्या गाडीतील तालुक्यातील शिवणी पिसा येथील प्रसाद रतन पिसे (१५) हा जागीच ठार झाला. वर्‍हाडाच्या गाडीतील अन्य तिघे गंभीर जखमी झाले. मात्र, तिघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मेहकर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. टिप्पर चालकाविरुद्ध लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन चालकास अटक केली आहे.

Web Title: Accident of Harvada vehicle; One killed