तालखेड खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

By Admin | Updated: May 12, 2014 22:37 IST2014-05-12T22:02:59+5:302014-05-12T22:37:13+5:30

पोलिसांनी सापळा रचून ७२ तासाच्या आत जेरबंद केले आहे.

The absconding accused in the murder case of Taljhed was arrested | तालखेड खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

तालखेड खून प्रकरणातील फरार आरोपीस अटक

मोताळा: मोताळा तालुक्यातील तालखेड येथील खुन प्रकरणातील आरोपीस बोराखेडी पोलिसांनी सापळा रचून ७२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. हय़ा आरोपीला पोलिसांनी तालखेड शिवारातीलच एका शेतातून अटक केली आहे. या बाबत सविस्तर असे की लक्ष्मण दोडे वय ६४ याने घर खाली करण्याच्या वादातून दारूच्या नशेत स्वत:च्या घरा समोर झोपलेल्या शांताराम दोडे वय ३२ या त्याच्या मुलाचा कुर्‍हाडीने गळय़ावर घाव घालून शुक्रवारी ९ मेच्या रात्री खुन केला होता. ही घटना १0 मे रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली होती. त्यानंतर बोराखेडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून लक्ष्मण दोडे याच्या विरू द्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. मात्र लक्ष्मण दोडे खुन करून तीन दिवसांपासून फरार होता. लक्ष्मणचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध तीन पथके रवाना केली होती. आज सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान तालखेड शिवारातीलच मधुकर गोवींद चोपडे यांच्या कॅनाल नजीक असलेल्या मक्याच्या शेतातून अटक केली. विशेष म्हणजे हा आरोपी गेल्या तीन दिवसांपासून तालखेड परिसरातच पोलिसांशी लपाछुपीचा डाव खेळत होता. तीन दिवस आरोपीने भूईमुंगाच्या शेंगा खात व पाटाचे पाणी पिवून दिवस काढले. मात्र आज बोराखेडी पोलिसांना आरोपीस अटक करण्यात यश आले आहे. आरोपीला अटक करण्यासाठी ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार आर.टी.शेवाळे, प्रकाश पाटील, बावणे, वानखेडे, चव्हाण, मोजे आदीं कर्मचार्‍यांसह तालखेडचे शिवदास दोडे यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: The absconding accused in the murder case of Taljhed was arrested