खामगाव शहरात ‘पारा’ ४४ च्या वर.

By Admin | Updated: May 24, 2014 00:08 IST2014-05-23T23:38:38+5:302014-05-24T00:08:05+5:30

नागरिक त्रस्त : वाढत्या तापमानाचा फटका !

Above 'Para' 44 in Khamgaon city | खामगाव शहरात ‘पारा’ ४४ च्या वर.

खामगाव शहरात ‘पारा’ ४४ च्या वर.

खामगाव: शहरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे रस्ते ओस पडत असल्याचे चित्र आहे. आज शुक्रवारी तापमानाने ४४.0५ अंशाचा पारा पार केल्याने अनेकांना उन्हाचा फटका बसला. या उन्हाचा बाजारपेठेवर विपरित परिणाम होत असून दुपार पूर्वीच शहरातील अनेक वस्त्यांमध्ये अघोषित संचारबंदी लागत असल्याचे चित्र आहे. मागील आठ दिवासांपासुन शहराचे तापमान ४४ ते ४५ डिग्री सेल्सीअसच्या वर पोहचत आहे. आज शुक्रवारी ४४.0५ अंश सेल्सीअस तापामानाची नोंद करण्यात आली.

Web Title: Above 'Para' 44 in Khamgaon city