पोटावर लाथ मारल्याने गर्भपात

By Admin | Updated: June 28, 2015 23:15 IST2015-06-28T23:15:16+5:302015-06-28T23:15:16+5:30

साखरखेर्डा परिसरातील घटना; गुन्हा दाखल.

Abortion due to kick on the stomach | पोटावर लाथ मारल्याने गर्भपात

पोटावर लाथ मारल्याने गर्भपात

साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आगेफळ शिवारातील शेतात काम करीत असताना एका इसमाने महिलेच्या पोटावर लाथ मारली. या प्रकारामुळे सदर महिलेचा गर्भपात झाला. महिलेच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी आरोपीविरुद्ध २८ जून रोजी गुन्हा दाखल केला. देऊळगाव कोळ येथील लक्ष्मी पुंडलिक कांबळे ही गर्भवती महिला १३ जून रोजी आगेफळ शिवारातील शेतात नेहमीप्रमाणे काम करीत होती. याच सुमारास नामदेव सत्यभान कांबळे हा तेथे आला. तुझा नवरा कोठे आहे, असे विचारून त्याने क्षुल्लक कारणावरून लक्ष्मीला मारहाण केली. या मारहाणीत लक्ष्मी कांबळेच्या पोटावर नामदेवने लाथ मारली. त्यामध्ये तिचा सहा आठवड्यांचा गर्भपात झाला. वैद्यकीय अहवाल आणि महिलेच्या तक्रारीवरून नामदेव कांबळे याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३१६, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेलार हे करीत आहेत.

Web Title: Abortion due to kick on the stomach