शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय ग्रामीण पेयजलची ७७ कामे प्रगतीपथावर!

By admin | Updated: October 3, 2016 02:51 IST

बुलडाणा जिल्ह्यासाठी ८६ कामांचे उद्दिष्ट दिले असून येत्या उन्हाळ्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करणे शक्य असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा, दि. 0२- जिल्ह्यात गेल्या तीन वर्षातील वाढती पाणी टंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. सन २0१६-१७ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी ८६ पाणी पुरवठय़ांच्या कामांचे उद्दिष्ट देण्यात आले असून जिल्हाभरात उद्दिष्टापैकी ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत.गेल्या तीन वर्षात पाणीटंचाईचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गावात अस्तित्वात असलेल्या सर्व पिण्याच्या पाण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यातील स्रोतांचे संवर्धन व बळकटीकरण करणे, तसेच पाणी पुरवठय़ाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रमांतर्गत शासनाच्या धोरणानुसार मागणी आधारित लोकसहभागातून पाणीपुरवठय़ाचे सुधारित धोरण जाहीर केले असून ग्रामस्तरावर ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती स्थापन केली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता योजनेची कामे मागणी आधारित समूह सहभागावर नियोजन, अंमलबजावणी आणि देखभाल व दुरुस्ती ग्रामस्थांच्या हातात सोपविण्यात आलेली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रस्तावित उपाययोजनांच्या सूक्ष्म नियोजनाअंती दरवर्षी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. त्याचप्रमाणे सन २0१६-१७ चा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखडा तयार करण्यात आलेला असून, कृती आराखड्यानुसार तालुकानिहाय पाणीपुरवठय़ाच्या ८६ कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यासाठी पाणीपुरवठय़ाची ८ कामे, चिखली ८, देऊळगावराजा ५, खामगाव ६, लोणार ४, मलकापूर ५, मेहकर १४, मोताळा १0, नांदुरा ११, सिंदखेडराजा १४, शेगाव एक अशा एकूण ८६ कामांचे उद्दिष्ट आहे. उद्दिष्टांपैकी जिल्ह्यात पाणीपुरवठय़ाची ७७ कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. जिल्ह्यातील जळगाव जामोद व संग्रामपूर या दोन तालुक्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले नाही. यामध्ये १00 टक्के घरगुती नळ जोडणे व मागील तीन वर्षात टँकरद्वारे पाणीपुरवठा केलेल्या गावांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे येणार्‍या उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही गावे टंचाईमुक्त होणार आहेत.उद्दिष्टाव्यतिरिक्त २0 कामांचा समावेश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यामध्ये ८६ कामांचे उद्दिष्ट आहे. तसेच उद्दिष्टाव्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम कृती आराखड्यात २0 कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यात २, चिखली ३, जळगाव जामोद १, खामगाव २, मलकापूर १, मेहकर २, नांदुरा ७, सिंदखेडराजा १, संग्रामपूर १ अशापक्रारे उद्दिष्टांव्यतिरिक्त कामांचा समावेश करण्यात आलेला आहे; परंतु उद्दिष्टाव्यतिरिक्तचे एकही काम सध्या हाती घेण्यात आलेले नाही.