शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१00 टक्के अनुदानावर ७00 सिंचन विहिरी !

By admin | Updated: March 13, 2017 01:57 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना; अर्ज सादर करण्याचे आवाहन.

वाशिम, दि. १२-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला ७00 सिंचन विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला असून, अनुसूचित जातीतील पात्र लाभार्थींंंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी केले.अनुसूचित जातीतील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनातर्फे विशेष घटक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत १00 टक्के अनुदानावर विविध साहित्य व विहिरींचा लाभ दिला जातो. यापूर्वी सिंचन विहिरींसाठी लाभार्थीला केवळ एक लाख रुपये अनुदान दिले जात होते. अनुदान वाढविण्याची मागणी राज्य स्तरावर विविध घटकांकडून झाली होती. तसेच कृषी सभापती विश्‍वनाथ सानप व कृषी विषय समितीने विहिरीचे अनुदान तीन लाख रुपये करण्याचा ठराव पारित करून शासनाकडे सादर केला होता. आता शासनाने या योजनेचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना असे केले असून, विहिरींचे अनुदान अडीच लाख रुपये केले आहे. जिल्हानिहाय विहिरींचा लक्ष्यांक शासनाने जाहिर केला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्याला ७00 विहिरींचा लक्ष्यांक प्राप्त झाला. यासाठी कृषी विभाग व सभापती सानप यांनी विशेष पाठपुरावा केला होता. विहिरीबरोबरच मोटारपंप व स्प्रिंकलर पाईपसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये, वीजजोडणीसाठी १0 हजार रुपये अनुदान मिळणार आहे