शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

६0 टक्के भावी शिक्षकांमध्ये निरुत्साह

By admin | Updated: November 22, 2014 01:21 IST

टीईटीला प्रतिसाद नाही : राज्यातील ५ लाखाच्यावर डीटीएड्धारक बेरोजगार.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)

           राज्यात सध्या जवळपास ५ लाखाच्यावर डीटीएड् धारक बेरोजगार आहेत. त्यांच्याकरीता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून सन २0१३ पासून टीईटी परीक्षा घेण्यात येत असून, यावर्षी राज्यातील ६0 टक्के भाविशिक्षकांमध्ये टीईटी परीक्षेसाठी निरूत्साह दिसून येत आहे. दरवर्षी अध्यापक पदविका घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांंची संख्या, शिक्षकांच्या रिक्त पदाच्या तुलनेत सहापटीने जास्त आहे. गत काही वर्षात राज्यात आवश्यकतेपेक्षा जास्त अध्यापक विद्यालयांना मान्यता मिळाल्याने विषम परिस्थि ती निर्माण झाली आहे. सन २00५ ते २0१३ या नऊ वर्षाच्या शैक्षणिक सत्रात राज्यातील आठ विभागांतर्गत १ हजार ४0५ अध्यापक विद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून, भावी शिक्षकांचा लोंढा बाहेर पडत आहे. सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी देणे शक्य नसल्याने शासनाने सीईटी ही सामाईक प्रवेश परीक्षा लागू केली. सन २0१0 मध्ये शिक्षकांच्या १५ हजार १२ जागांसाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यावेळी १ लाख ८५ हजार ८00 विद्यार्थ्यांंनी सीईटी परीक्षा दिली. त्यापैकी १५ हजार १२ विद्यार्थ्यांंची निवड करण्यात आली. त्यामध्ये उर्वरीत ७0 हजार ७८८ भावी शिक्षक नोकरीपासून वंचीत राहिले. राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दज्रेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भाविशिक्षकांची पुन्हा चाळणी करण्यास सुरूवात केली. शिक्षक होण्यासाठी केवळ सीईटी परीक्षाच उत्तीर्ण होणे बाकी नसून; त्यासाठी टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा सन २0१३ पासून घेण्यात येते. गतवर्षी सुमारे ६ लाख २१ हजार विद्यार्थ्यांंनी टीईटी परीक्षा दिली होती. परंतू, त्यामध्ये तब्बल ९५ टक्के उमेदवार नापास झाले होते. त्यानंतर यावर्षी पुन्हा १४ डिसेंबर रोजी टीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा राज्यातून ३ लाख ८५ हजार भाविशिक्षक देणार आहेत. परंतू, डिसेंबरमध्ये घेण्या त येणार्‍या या टीईटी परीक्षेसाठी राज्याभरातून उमेदवारांची संख्या वाढण्याऐवजी तब्बल ६0 टक्क्यांनी घटली आहे. बेरोजगारांच्या तुलनेत शिक्षक भरतीचे प्रमाण अत्यल्प असल्याने, दरवर्षी अध्यापक पदवीका घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी बेरोजगारीच्या खाईत ढकलले जात आहेत. सद्यस्थितीत राज्यात जवळपास ५ लाखाच्यावर डीटीएड् धारक बेरोजगारीच्या जाळ्यात अडकले आहेत.