शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डायरियामुळे बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी ५७ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 11:43 IST

57 children die every year in Buldana district due to diarrhea : बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनामुळे गेल्या वर्षी खंड पडलेल्या अतिसार (डायरिया) नियंत्रण पंधरवाडा मोहिम यावर्षी अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्यात येणार असून १५ जुलै पासून या मोहिमेस जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. दरम्यान बुलडाणा जिल्ह्यात वर्षाकाठी जवळपास ५७ बालकांचा डायरियामुळे मृत्यू होतो. त्या पार्श्वभूमीवर हे प्रमाण शुन्य टक्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने या वर्षी ही मोहिम अधिक जोरकसपणे राबविण्याचा निर्धार केला आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात जवळपास २०१४ पासून अतिसार अर्थात डायरिया नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत असतो. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे या मोहिमेला ब्रेक देण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी ही मोहिम अधिक गांभिर्यपूर्वक राबविण्याचा निर्धार आरोग्य विभागाने केला आहे. देशामध्ये बालमृत्यूचे प्रमाण पाहता त्यापैकी दहा टक्के मृत्यू हे डायरियामुळे होत असल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढलेला आहे. त्या आधारावर दरवर्षी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येतो. यामध्ये अतिसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तथा रुग्णालयात अतिसार झालेल्या बालकाला केव्हा दाखल करणे आवश्यक आहे. सोबतच अेाआरएस आणि झिंक गोळ्यांचे डोस नियमितपणे कसे द्यायचे यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन जिल्ह्यातील १८०० आशा वर्कसच्या माध्यमातून घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. अेाआरएसचे द्रावण अर्थात क्षारसंजिवनी कशी तयार करायची याचेही प्रात्याक्षीक दिल्या जाणार आहे. डायरिया प्रामुख्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर लहान मुलांना होतो. 

१५ जुलै ते ३० जुलै दरम्यान जिल्ह्यात अतिसार नियंत्रण मोहिम राबविण्यात येत आहे. यामध्ये डायरियामुळे होणाऱ्या बालकांच्या मृत्यूचे प्रमाण हे शून्य टक्क्यांवर आणण्याचे आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सोबतच या पंधरवाड्यात जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये अेाआरएस व झींक कॉर्नर उभारण्यात येऊन याविषयी जनजागृती केली जाणार आहे.- डॉ. रविंद्र गोफणे, माता व बालसंगोपन अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाHealthआरोग्य