शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराजवळील ५0 हजार लुटले!

By admin | Updated: March 28, 2017 01:40 IST

मेहकर ते जानेफळ रोडवर फर्दापूर शिवारामध्ये मोटारसायकलवर जाणार्‍या एका इसमाकडून ५0 हजार रुपये लुटल्याची घटना

मेहकर, दि. २७- मेहकर ते जानेफळ रोडवर फर्दापूर शिवारामध्ये मोटारसायकलवर जाणार्‍या एका इसमाकडून ५0 हजार रुपये लुटल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. याबाबत पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक केली आहे.रवींद्र ऊर्फ लक्ष्मण बळीराम दांडगे रा.सुलतानपूर हा ५0 हजार रुपये घेऊन आपल्या बहिणीला देण्यासाठी जानेफळला जात होता. रवींद्र दांडगेसोबत मोटारसायकलवर त्याचा मित्रसुद्धा होता. दरम्यान, फर्दापूर शिवारामध्ये नंदु माणिक पवार, आकाश बच्छू चव्हाण, नसीब बच्छू चव्हाण, जिरु बाबूराव पवार, लक्ष्मण मधुकर चव्हाण रा.पांगरखेड ता.मालेगाव, जि.वाशिम, विजय दिनकर तायडे रा. रिसोड यांनी रवींद्र दांडगे व त्याच्या मित्राची मोटारसायकल अडवून त्याला चाकूचा धाक दाखवून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून त्याच्याजवळून ५0 हजार रुपये लुटले. दरम्यान, रवींद्र दांडगे यांनी आरडा-ओरड केल्याने गावकर्‍यांनी धावून जाऊन या आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यासंदर्भात रवींद्र ऊर्फ लक्ष्मण बळीराम दांडगे रा.सुलतानपूर याच्या फिर्यादीवरुन वरील सहा जणांविरुद्ध पोलिसांनी अ.पं.नं.५९/१७ कलम ३४१, ३५९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. काही वेळातच केले आरोपींना अटकमोटारसायकल अडवून व चाकूचा धाक दाखवून ५0 हजार रुपये लुटल्याची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी रामेश्‍वर व्यंजने, पोलीस निरीक्षक मोतीचंद राठोड, उपनिरीक्षक विलास मुंढे, ए.एस.आय. सोनुने व कर्मचार्‍यांनी गवंढाळा, कंबरखेड, कल्याणा परिसरात सापळा रचला तर त्या गावच्या पोलीस पाटलांनासुद्धा माहिती देण्यात आली होती. तसेच लोणार, साखरखेर्डा, जानेफळ, डोणगाव येथील पोलीस कुमकसुद्धा बोलाविण्यात आली होती. अखेर पोलिसांनी काही वेळातच सदर दरोडेखोरांना अटक करुन गुन्हा दाखल केला.