मारोती संस्थानला केली ५0 लाखाची जागादान

By Admin | Updated: January 20, 2015 23:15 IST2015-01-20T23:15:29+5:302015-01-20T23:15:29+5:30

हिंदु मुस्लिम समाजापुढे भाई मन्सूर अजिज दाऊद यांचा आदर्श.

50 lakhs of land allotment to Maroti Sanstha | मारोती संस्थानला केली ५0 लाखाची जागादान

मारोती संस्थानला केली ५0 लाखाची जागादान

मोताळा (बुलडाणा): हिंदू-मुस्लीम समाजातील वादाचे प्रसंग सर्वांनाच माहित आहेत मात्र हिंदूच्या मंदिरासाठी मुस्लीम बांधवाने जागा उपलब्ध करून देण्याचा प्रसंग विरळच. नांदूरा-मोताळा मार्गालगत मन्सुर अजिज दाऊद यांचे सिमेंट हाऊसची जागा असुन तिची आजची किमंत ५0 लाख रुपये आहे मात्र गावातील मारोती संस्थानसाठी मन्सूर अजिज दाऊद यांनी ही जागा दान करून सामाजीक सद्भावनेचे अनोखे उदाहरण ठेवले आहे.
मोताळा-नांदूरा मार्गाला लागून मारोती संस्थानच्या १ हेक्टर ९ आर पडीत जागेवर भव्य व्यापारी संकूलाचे काम संस्थानाच्या वतीने सुरु आहे. या जागेवरच रोडला लागून भाई मन्सूर अजिज दाऊद यांची सिमेंट हाऊस हे दुकान आहे. या दुकानाची व्यापारीसंकूल तयार करण्यासाठी अडचण होत होती ही अडचण ओळखून सदर जागा संस्थानला देण्याबाबत संस्थानच्यावतीने मन्सूर अजिज दाऊद यांना विनंती करण्यात आली. या विनंतीचा मन्सुर अजिज यांनी तत्काळ स्विकार करीत ही जागा श्री मारोती संस्थानला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाबद्दल मारोती संस्थानच्यावतीने अध्यक्ष अण्णा देशमुख यांच्याहस्ते भाई मन्सूर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

Web Title: 50 lakhs of land allotment to Maroti Sanstha