शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयाचे ४३ टक्के उद्दिष्ट अपूर्ण!

By admin | Updated: March 11, 2017 01:41 IST

मार्चपर्यंंत केवळ ५७ टक्केच पूर्ण; स्वच्छ भारत अभियानाची गती मंदावली.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. १0- जिल्हा परिषदेच्या स्वच्छता अभियानांतर्गंंत मार्च २0१७ पर्यंंत ग्रामीण भागातील ३५४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यासाठी ६८ हजार शौचालये बांधकामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ ५७ टक्केच शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. अद्याप ४३ टक्के शौचालयांचे बांधकाम व्हायचे आहे. सध्या मार्च महिना संपत आला असल्यामुळे जिल्ह्यातील हगणदरीमुक्त मोहिमेची गती मंदावली असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायतींपैकी १५२ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी ३५४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त करण्यासाठी ६८ हजार शौचालये बांधकामाचे मार्च २0१७ पर्यंंत उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात शासनाने ३१ डिसेंबरनंतर उघड्यावर शौचालयास जाणार्‍या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला होता. मध्यंतरी नोटाबंदीमुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशनचे अधिकारी व कर्मचार्‍यांची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कसरत होत होती. लाभार्थीस घरी शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. मात्र, नोटाबंदीमुळे शौचालय लाभार्थींंस बँक खात्यातून पैसे काढणे कठीण झाले होते. मात्र आता नोटाबंदीचे वातावरण दूर झाल्यामुळे ग्रामीण भागात शौचालय बांधकामाला वेग आला आहे. आजरोजी मलकापूर तालुका हगणदरीमुक्त झाला असून, शेगाव तालुका ३१ मार्चपर्यंंंत हगणदरीमुक्त होणार आहे. जिल्ह्यातील नांदुरा, जळगाव जामोद, देऊळगाव राजा या तालुक्यांची हगणदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.सामाजिक कार्यक्रमातून हगणदरीमुक्तीसाठी जागृतीजिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मार्च २0१७ पर्यंंत असलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत असले, तरी काही सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. वाढदिवस, लग्नसमारंभ आदी कार्यक्रमातून गाव हगणदरीमुक्ती तसेच शौचालय बांधकामास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करण्यात येत असून, पत्रिकेत संदेश प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात अनेक गावे हगणदरीमुक्त होतील.