शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यात ३१ ठार, १७४ जखमी

By admin | Updated: May 16, 2014 00:04 IST

बुलडाणा जिल्ह्यात अवघ्या दोन महीन्यात ४६ अपघातात ३१ ठार झाले आहेत.

बुलडाणा : अपघात कशामुळे व कोणत्या चुकीमुळे होतात, यांचे चिंतन करण्याची वेळ आता येवून ठेपली आहे. कारण गेल्या एप्रिल आणि मे या दीड महिन्याच्या काळात जिल्हाभरात झालेल्या ४६ अपघातात ३१ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर १७४ लोक जखमी झाले. जिल्ह्यातील बेशिस्त वाहतुकीने अनेकांचे बळी घेतले असून, अपघाताची ही मालिका सुरु आहे. खरे तर अपघाताची ही मालिका १0 एप्रिलनंतर सुरु झाली; मात्र त्यापूर्वी ३१ मार्च रोजी मोताळा आणि मेहकर तसेच ४ एप्रिल रोजी चोरपांग्रा व खामगाव शिवारात झालेल्या विविध अपघातात एक जण ठार झाला होता, तर ६ प्रवासी जखमी झाले होते. ११ एप्रिल रोजी मोताळा येथे ट्रॉली उलटून एक महिला ठार झाली. तर १३ एप्रिल रोजी मलकापूर येथे झालेल्या अपघातात १ ठार तर ३ जखमी झाले. तर १४ ला खामगाव येथे एकाचा मृत्यू झाला. यानंतर १६ ला मलकापूर आणि खामगाव येथील महामार्गावर दोन अपघात घडले. यात ३ ठार आणि १ प्रवासी जखमी झाला. १७ एप्रिल रोजी साखरखेर्डा व मोताळा येथे झालेल्या अपघातात २ ठार झाले. तर १८ एप्रिलला मोताळा येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू झाला. १९ एप्रिल रोजी नांदुरा शहरनजिक अपघात होऊन १ ठार, १ जखमी झाला. तर २0 एप्रिल रोजी मोताळा आणि सोनाटी येथे अपघातात २ जण गंभीर जखमी झाले. २१ एप्रिल रोजी मोताळा, खामगाव आणि सुलतानपूर येथे अपघातात १ ठार आणि ६ लोक जखमी झाले. २२ रोजी मोताळा शहरानजिक ट्रॉलीवर दुचाकी आदळून शिक्षकाचा मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली. २३ एप्रिल रोजी मेहकर नजिक लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मेटाडोरला अपघात होऊन २0 वर्‍हाडी जखमी झाले होते. खामगाव आणि मलकापूर येथील महामार्गावर २७ एप्रिल रोजी झालेल्या विविध अपघातात २ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर ७ जण जखमी झाले. शेगाव येथे २९ एप्रिलला एका पादचार्‍याला वाहनाने उडविले. २९ एप्रिलला चिखली तालुक्यातील शेलसूर येथे दुचाकी अपघातात २ तरुण ठार झाले तर बुलडाणा तालुक्यातील धांदरवाडी येथे दोघांना अज्ञात वाहनाने यमसदनी पाठविले. तर ३0 एप्रिल नांदुरा येथे खासगी वाहनाला अपघात होऊन ६ जखमी झाले.