शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

मृत जनावरांची संख्या ३00

By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST

खामगाव महसूल विभागाचे दुर्लक्ष : पशुवैद्यकीय पथकाकडून युद्धपातळीवर तपासणी.

खामगाव : खामगाव तालुक्यासह शेगाव तालुक्यातील शेकडो जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, मृत जनावरांचा आकडा ३00 पेक्षा जास्त असल्याची शक्यता आहे. गुरुवारपासून जनावरे दगावण्याचे सत्र सुरूच असून, आतापर्यंत खामगाव तालुक्यातील २३0 च्या वर जनावरे दगावली आहेत. त्याचप्रमाणे शेगाव तालुक्यातील ६५ जनावरे दगावल्याची माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील पशुपालक कमालीचे धास्तावले आहेत. खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे आतापर्यंत १४0 च्यावर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामध्ये शुक्रवारी शंभरावर जनावरे दगावली होती. शनिवारी १५ तर आज रविवारी ६ जनावरे दगावली आहेत. त्यापाठोपाठ तालुक्यातील पोरज, मांडणी, कोन्टी, गेरू या ठिकाणीही जनावरे दगावण्याचे लोण पसरले आहे. खामगाव तालुक्यासह शेगाव तालुक्यातील जलंब, माटरगाव, मच्छिंद्रखेड, निंबी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावली आहेत. शेगाव तालुक्यात ६0 च्यावर जनावरे दगावली असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर येणार्‍या काही दिवसात जंगल परिसरात मृत जनावरांचा आकडा वाढू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे जनावरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असून, मृत जनावरांचे सर्वेक्षण पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे. शेगाव तालुक्यात तहसीलदार डॉ. रामेश्‍वर पुरी यांनी पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.एन. इंगळे यांना परिस्थिती हाताळण्यासाठी निर्देश दिले असून, मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना, सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. महसूल प्रशासन झोपेत!खामगाव तालुका आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात जनावरे दगावली असल्याचे वास्तव आहे. पशुसंवर्धन विभागाने सर्व्हेक्षण करून मृत जनावरांचे शवविच्छेदनही केले आहे. मात्र, अद्यापपर्यंत महसूल प्रशासनाच्यावतीने या संदर्भात कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे. घटनेला तीन-चार दिवस लोटल्यानंतरही महसूल प्रशासन अद्यापपर्यंत कोणत्याही गावात पोहोचले नसल्याची वस्तुस्थिती आहे. खामगाव तालुक्यातील एकट्या हिवरखेड या गावात एकाच शेतकर्‍याची ५९ जनावरे मृत्युमुखी पडली असून, या गावातील तब्बल १४१ च्यावर जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यासोबतच मांडणी, कोन्टी, गेरू, पोरज आदी गावेही बाधित झाली आहेत. मात्र, महसूल प्रशासनाकडे यासंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.*गावनिहाय मृत्युमुखी पडलेली जनावरेहिवरखेड ता. खामगाव          १४१मांडणी, ता. खामगाव             ३0कोन्टी, ता. खामगाव              २0गेरू, ता. खामगाव                 १५पोरज, ता. खामगाव              १५माक्ता, ता. खामगाव               ५माटरगाव, ता. शेगाव             ३५जलंब, ता. शेगाव                  १५मच्छिंद्रखेड, ता. शेगाव           १0निंबी, ता. शेगाव                     ५